बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी बीडमध्ये जंगी सभा घेतली.त्यामध्ये पवारांसह सर्वच नेत्यांनी फुटीर लोकांवर टीकास्त्र सोडलं.आता पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची येत्या 27 ऑगस्ट रोजी बीडला उत्तर सभा होत आहे.छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे ही सभा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमधील सभा जोरदार झाली.या सभेत पवार,आव्हाड,जयंत पाटील,आ संदिप क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्यासह फुटीर गटावर जोरदार टीका केली. बीडमध्ये पवारांच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होती.
पक्षातील फुटीनंतर पवार यांची ही राज्यातील दुसरी सभा होती.येवल्यानंतर बीडमधील सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते.आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील काकांना उत्तर देण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
बीडमध्ये येत्या 27 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे ही सभा होणार आहे.धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड व इतरांनी आज सभास्थळाची पाहणी केली.काकांच्या टीकेला अजित पवार अँड कंपनी कशाप्रकारे उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply