News & View

ताज्या घडामोडी

ठाकर,रियाज,एजाज यांची जिल्ह्याबाहेर बदली !

बीड- जिल्हा रुग्णालयात कोरोना काळापासून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस फार्म दाखवून कोट्यवधी रुपयांचे साहित्य अन औषध खरेदी करत भ्रष्टाचार करणारे तानाजी ठाकर,रियाज शेख आणि एजाज शेख यांनी जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोणतेही जिल्हा शिल्लक चिकित्सक असले तरी स्टोअर सांभाळण्याची जबाबदारी औषध निर्माण अधिकारी आदिनाथ मुंडे तानाजी ठाकर रियाज शेख आणि एजाज शेख यांच्यावरच असायची या चौघांनी मिळून जिल्हा रुग्णालय Civil Hospital Beed आणि शासनाची अक्षरशः कोट्यावधी रुपयांची लूट केली आहे.

कोरोना Covid19 सारख्या काळात औषध निर्माण अधिकारी पदावर बसलेल्या तानाजी ठाकर आणि रियाज शेख या दोघांनी तर तत्कालीन सी एस थोरात गीते साबळे या सगळ्यांना आपल्या खिशात घालत करोडो रुपये छापले गणेश बांगर डॉक्टर जयश्री बांगर राजरतन जायभाय यांच्या माध्यमातून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस कंपन्या काढून या चौघांनी शंभर ते दीडशे कोटी रुपये छापले

तानाजी ठाकर (thakar Tanaji)आणि रियाज शेख या दोघांना तर एवढा माज चढला होता की पत्रकार असो शासकीय अधिकारी असो किंवा चौकशी समिती कोणालाही ते मोजत नव्हते लातूर आणि मुंबई येथील चौकशी पथकाला अपुरे कागदपत्र देत चौकशीत असहकार्य केल्याचा ठपका देखील यांच्यावर समितीने ठेवला होता दरम्यान बोगस नोकर भरती प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे (suresh sable) यांचे निलंबन झाल्यानंतर ठाकर रियाज आणि एजाज यांच्यावरही कारवाई होणार हे निश्चित होते

दरम्यान तानाजी ठाकर याची उस्मानाबाद स्त्री रुग्णालय येथे तर रियाज शेख यांची औसा येथे तर एजाज शेख यांची कळंब येथे तडकाफडकी बदली झाली आहे दरम्यान न्यूज अँड व्युज च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सीजन प्लांट खरेदी आणि कोरोना काळातील औषध खरेदी प्रकरणात येत्या आठवडाभरात ठाकर आणि रियाज यांचे निलंबन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *