बीड- जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही स्टेट किंवा महसूल विभागात करता येत नाही,अन अशी बदली करायची असेल तर विभागीय आयुक्त यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते,मात्र बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी पशुसंवर्धन विभागातील एका चालकाची बेकायदेशीर पध्दतीने स्टेट पशुसंवर्धन विभागात बदली केली आहे.हे कमी की काय म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम आर लाड यांनी स्वतःला अधिकार नसताना त्यांच्याकडे असलेला एक ड्रायव्हर तहसीलदार बीड यांचाकडे वर्ग केला आहे,यासाठी सामान्य प्रशासन विभाग किंवा सीईओ यांची परवानगी घेण्यात आली नव्हती.लाड यांनी हा कहर केला आहे,त्यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा होऊ लागली आहे.
बेकायदेशीर बदल्या,प्रमोशन करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्यानंतर सीईओ अजित पवार यांनी त्यांच्यापुढे एक पाऊल टाकले आहे.जिल्हा परिषदेच्या सेवेत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना स्टेट आणि महसूल च्या सेवेत पाठवण्यात आले आहे. जे बेकायदेशीर आहे.यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा आणि पशुसंवर्धन विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचा हातभार लागला आहे.
गेल्या दीड दोन वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेत प्रशासकीय राज असल्याने मनमानी कारभार सुरू आहे.शासनाचे नियम कसे पायदळी तुडवता येतील अन बेकायदेशीर काम कस करता येईल यासाठी सीईओ पवार यांच्यासह त्यांचे बगलबच्चे कामाला लागले होते.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी जाता जाता तीनशे शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या केल्या तसेच बीजलवाड, गायकवाड यांच्यासह अनेकांना बेकायदेशीर पदोन्नती दिली गेली आणि त्याच विभागात पदस्थापणा दिली गेली.
दरम्यान काळे यांनी मोठा झपका हनल्यानंतर सीईओ अजित पवार यांनी बदलीची ऑर्डर आल्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वाहनचालक सुनील ढोकळे याला परस्पर तहसीलदार बीड यांच्या गाडीवर बदली करून पाठवण्यात आले. तसेच पशुसंवर्धन विभाग बीड येथील पोपट डोळे नावाच्या वाहन चालकाची बेकायदेशीर बदली उपायुक्त पशुसंवर्धन बीड येथे करण्यात आली आहे.
ढोकळे यांची बदली करण्यासाठी उपअभियंता एम आर लाड यांनी कार्यकारी अभियंता यांची परवानगी घेतली नाही तसेच तहसीलदार यांचे कोणतेही पत्र कार्यालयात आलेले नसताना सीईओ यांच्याशी थेट व्यवहार करत ढोकळे यांची बेकायदेशीर बदली केली.
पशुसंवर्धन विभागातील डोळे हे तर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत,त्यांना स्टेट कडे वर्ग करता येत नाही हे माहीत असताना जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी यांनी आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी संगनमत करून डोळे यांची बदली केली.यामध्ये देखील अजित पवार यांनी थेट पशुसंवर्धन विभागाशी व्यवहार केला आहे.
Leave a Reply