मेष– मनात आनंदी विचार राहतील. लोक तुमच्या मदतीला पुढे येतील. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. खाण्या पिण्याची चंगळ राहील. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. कुणाला मदत करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ – व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मालाची विक्री चांगली होईल. हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. थोडा आराम करण्याची गरज आहे. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कर्क – काही तरी नवीन करून दाखवण्याची इच्छा मनात येईल. त्यासाठी वेळ द्याल. पैशाचा ओघ सुरू राहील. आपला वेळ निष्कारण दाया घालवू नका. लोकांच्या उपयोगी पडाल. पण, लोकाना उपकाराची जाणीव राहणार नाही. कुटुंबासाठी वेळ द्या.
मिथुन– धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. जनसंपर्क चांगला राहील. सामाजिक कार्यात शब्दाने शब्द वाढणार नाही याची काळजी घ्या. भोजनाचा आस्वाद घेता येईल, उसने पैसे देताना विचार करून द्या.
सिंह– तुमचे महत्त्व लोकांच्या लक्षात येईल. कामाचा ताण कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न फलद्रूप होतील. जवळच्या लोकांशी संवाद राहील. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च होईल. नियोजनबद्ध पद्धतीने कामे करा.
कन्या– एखावा उलाढालीत मोठा आर्थिक फायदा होईल. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे तुमचा अनावश्यक पैसा व वेळ खर्च होणार नाही. इतरांच्या भानगडीत पडू नका. आपली नेहमीची कामे वेळच्या वेळी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा.
तूळ – तुमचे महत्त्व वाढेल. लोक तुमची मदत करण्यासाठी पुढे येतील. आत्मविश्वासाने वाटचाल सुरु राहील, एखाद्या सौधात चांगली मिळकत होईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. सफलता मिळेल.
वृश्चिक– महत्त्वाची कामे पुढे ढकलणे योग्य राहील. तुमच्या कामात काही विघ्नसंतोषी लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. आरामात कामे करण्यावर भर द्या. कधी कधी संयम बाळगण्याची गरज असते. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल.
धनू – स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. महत्त्वाचे निरोप येतील. मुलाची प्रगतीच्या पार्ता कळतील. एखाद्या उपक्रमात तुमचा पुढाकार राहील. जनसंपर्क चांगला राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. मौजमजा करण्यासाठी प्रवास घडून येईल.
मकर – व्यवसायात सतत कार्यरत राहावे. लागेल. फुरसतीचा वेळ मिळणार नाही. लोकाचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यामुळे तुमची तारांबळ उडेल. शांत चिंत्ताने कामे करत राहिल्यास ती पूर्ण होतील.
कुंभ – जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या अडचणी समजून घ्या. जवळचे लोक बरेचदा अडचणीत असले तरी वरून तसे दाखवत नाहीत. प्रवासात ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होतील. व्यवसायात मालाची विक्री चांगली होईल.
मीन – तुम्हाला ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पार पडेल. जवळच्या लोकांचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल. मनात सकारात्मक विचार राहतील, जीवनसाथीशी कठोर संभाषण टाळा.
Leave a Reply