News & View

ताज्या घडामोडी

पाठक साहेब माटेसारख्या बोगस विस्तार अधिकाऱ्यांना घरी बसवणार का ?

बीड जिल्हा परिषद म्हणजे घोडे घास खा रहे और गधे गुलगुले खा रहे है अशी अवस्था झाली आहे सिद्धेश्वर माटे या माणसाने पदोन्नती नसताना आणि पदोन्नतीसाठी आवश्यक अनुभव आणि शैक्षणिक अहर्ता नसताना जावयाच्या जीवावर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला या माटे सारखे पाच लोक आणखी आहेत जे बोगस शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आजही जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत सीईओ अविनाश पाठक माटे सहित इतर बोगस शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि त्यांना घरी बसवणार का याबाबत आता तर कवितर्क लावले जात आहेत

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू आहे.आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशी अवस्था आहे.नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी शिक्षण विस्तार अधिकारी सिद्धेश्वर माटे याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर एकच खळबळ उडाली.

माटे यांच्यावर ज्या कारणावरून कारवाई होण्याची शक्यता आहे त्यापेक्षा जास्त कुटाणे माटे यांनी केले आहेत.

पूर्वीचे सीईओ राजीव जवळेकर यांना खुश करून माटे याने बोगस शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती घेतली.मात्र नामदेव ननावरे यांच्या काळात माटे यांची पदावनती करण्यात आली.

त्यानंतर माटे यांनी जावई अजय बहिर यांच्यामार्फत आपली फाईल क्लियर करून घेण्याचा प्रयत्न केला.

बीड जिल्हा परिषदेच्या शेकडो मुख्याध्यापक आणि सिनियर केंद्रप्रमुख यांच्या स्वप्नावर पाणी फिरवक्त माटे याला विस्तार अधिकारी म्हणून पुन्हा पदोन्नती देण्यात आली.त्याच्यासोबत शिवाजी अंडील (धारूर),सीमा टकले (आष्टी),दत्ता चाटे (केज) आणि रामचंद्र सुळे (पाटोदा) यांनी देखील बोगस कागदपत्राच्या आधारावर पदोन्नती मिळवली.

नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी सिद्धेश्वर माटे यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवली आहे आता पाठक यांनी माटे यांच्यासह इतर चार बोगस विस्तार अधिकारी यांच्या फाईल मागून घेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *