News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednews

  • ट्रकने मजुरांना चिरडले ! पाच जणांचा मृत्यू !!

    बुलढाणा-राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या मजुरांवर एक ट्रक काळ बनून आला.भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे.. यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथील मजूर काम करत असून महामार्गावर उड्डाणं पुलाचे काम सुरु आहे.. त्या…

  • बीडच्या अविनाशने पटकावले सुवर्णपदक !

    नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावले.भारताचे दिवसभरातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. अविनाश ने जेव्हा अंतिम रेषा ओलांडली तेव्हा त्याचे प्रतिस्पर्धी चित्रातही नव्हते. भारताचे हे दिवसातील दुसरे सुवर्णपदक आहे आणि सध्या सुरू असलेल्या खेळांमधील साबळेचे पदक हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे १२ वे सुवर्ण आणि हांगझोऊमधील पहिले ट्रॅक…

  • मोक्कातील फरारी आरोपींना ठोकल्या बेड्या !

    बीड- सीबीआय चे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.यातील एक आरोपी हा मोक्का अंतर्गत फरार होता.तब्बल वीस पेक्षा अधिक गुन्ह्यात हवे असलेले हे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. हयात अली बाबूलाल अली आणि मिस्किन जावेद जाफरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.मागील महिन्यात या आरोपीनी अंबाजोगाई लातूर…

  • ट्रॅफिक पोलिसांना धाब्यावर दारू तपासायचे अधिकार आहेत का ?

    बीड- शहर वाहतूक असो की जिल्हा वाहतूक शाखा ,या शाखेला राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गावरील धाबे किंवा हॉटेल तपासणीचे अधिकार आहेत का ? निश्चितच नाहीत,मात्र बीडमधील ट्रॅफिक पोलीस शासकीय वाहनातून जालना रोडवरील धाब्यावर धाडी टाकल्याचे दाखवून तोडीपाणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड शहर आणि जिल्हाभरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले.यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात…

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत येण्यामुळे माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह – पंकजा मुंडे !

    मुंबई- शिवसेना आणि भाजप युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश झाला आणि यामुळे माझ्या अस्तित्वावर आणि मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सतत मी याला भेटले त्याला भेटले याची ऑफर त्याची ऑफर अशा चर्चा सुरू झाल्याने मी दोन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला असा खळबळ जनक खुलासा भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा…

  • आता थेट मंगळवारी सरकारी कार्यालय उघडणार !

    मुंबई- गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने देणायत आलेली गुरुवारची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता शुक्रवारी सुट्टी असेल,त्यामुळे सरकारी कार्यालये थेट मंगळवारी उघडतील. अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी २८ सप्टेंबरला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे…

  • कुलकर्णी साहेब माटे ला घरी पाठवायला मुहूर्त पाहताय का ?

    बीड- प्राथमिक शिक्षक असतानाही बोगस कागदपत्रे जोडून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवणाऱ्या सिद्धेश्वर माटे यांच्यावर शिक्षण विभाग भलताच मेहेरबान असल्याचे चित्र आहे माटे यांच्या विषयी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांनी सविस्तर अहवाल दिल्यानंतर देखील चौकशी समितीच्या नावाखाली शिक्षणाधिकारी कुलकर्णी हे माटेंना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे कुलकर्णी साहेब माटे यांना घरी पाठवण्यासाठी…

  • पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई !

    बीड- परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने जप्तीची कारवाई केली आहे.19 कोटी रुपयांचे साहित्य या विभागाने पोलीस बंदोबस्तात जप्त केले.भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या….

  • जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी !

    बीड- जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी,अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.धानोरा मंडळात तब्बल 132 मिमी पावसाची नोंद झाली.या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याचे,शेतीचे नुकसान झाले. आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळ (68.8 mm), कडा मंडळ (93.5 mm), दौलावडगाव मंडळ (89.8 mm), पिंपळा (72.3 mm) व धानोरा मंडळ (132.5 mm) तसेच अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई…

  • शंभर टक्के अग्रीम देऊन बळीराजाला साथ द्या- आ क्षीरसागर !

    बीड- यावर्षी जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने दोन अडीच महिने ओढ दिली.त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपून गेले.महाग मोलाचे बियाणे वाया गेले.शेतात काहीच पिकलं नाही.त्यामुळे कोलमडून पडलेल्या बीड जिल्ह्यातील बळीराजाला सरकारने साथ द्यावी.शंभर टक्के अग्रीम मंजूर करावा अशी मागणी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अग्रीम द्या आ.संदीप क्षीरसागर यांची मागणी बीड मतदारसंघासह…