News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण…

  • लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    बीड- कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या आपल्याच साहेबांचे पगार बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजी नगर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयात नोकरीस असलेले कार्यकारी अभियंता यांच्याकडे जून ते ऑक्टोबर 2023 या पाच महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी प्रत्येक महिन्याचे दोन हजार याप्रमाणे दहा हजार…

  • नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    बीड- शहरातील सुभाष रोड,माळीवेस भागात नाल्यांची साफसफाई सुरू असताना जेसीबीच्या खोऱ्यात चक्क मानवी मृतदेह आल्याने खळबळ उडाली.पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे.बीड शहरातील सुभाष रोडवर असलेल्या नेहरू नगर च्या मोठ्या नाल्याची जेसीबी मार्फत साफसफाई सुरू होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या खोऱ्यात…

  • अशोक चव्हाण,मेधा कुलकर्णी, अजित गोपच्छडे यांना भाजपची उमेदवारी !

    अशोक चव्हाण,मेधा कुलकर्णी, अजित गोपच्छडे यांना भाजपची उमेदवारी !

    मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेस मधून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, माजी आ मेधा कुलकर्णी आणि नांदेड चे अजित गोपच्छडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी देशभरातील 56 राज्यसभा उमेदवारासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र मधून 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यापुढे…

  • अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

    अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

    मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी आ अमरनाथ राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपमध्ये घाऊक प्रवेश सुरू झाले आहेत.काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेकवेळा येत होत्या.अखेर त्यावर शिक्कामोर्तब…