Category: बीड
-
गड कायम देशमुख कुटुंबाच्या पाठीशी -महंत नामदेव शास्त्री!
भगवानगड -मी कधीही कोणत्याच आरोपीची पाठराखण केलेली नाही, करणार देखील नाही, उलटपक्षी भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी कायम राहील. आरोपीना फाशी व्हावी हीच आपली भूमिका आहे असे मत भगवानगडाचे महंत नामदेव शात्री यांनी व्यक्त केले. संतोष देशमुख कुटुंबाने रविवारी शास्त्री यांची भेट घेतली. नामदेव शास्त्री यांनी दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी गड असल्याचे म्हटले हॉटेल….
-
निलंबित पोलीस दोन दिवसापासून गायब!
बीड -पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वाळू प्रकरणात निलंबित केलेला पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे हा दोन दिवसापासून गायब असल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी चार वाजेपासून त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध पोलीस अधीक्षक यांनी कारवाई सुरु केली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांना त्यांनी नुकतीच समज दिली. बीड जिल्ह्यात गुटखा, मटका,…
-
जिल्ह्यात जातीयवादाचे विष पेरण्याचा प्रयत्न -मंत्री धनंजय मुंडे यांनी डीपीसी बैठकीत मुद्याला घातला हात!
बीड – बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून जातीयवादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत असून, जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही.त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी दडपणाखाली काम करत आहेत, हे चित्र पालकमंत्री अजित पवार यांनी बदलण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत…
-
मतदार संघाच्या विकासासाठी आ क्षीरसागर यांच्या अजित पवारांकडे उपयुक्त मागण्या!
बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी शिक्षण, आरोग्य, महिला बाल कल्याण, क्रीडा, स्वछता, रस्ते, महावितरण, तीर्थक्षेत्र विकास अशा विविध विषयावर मागण्या केल्या. बीडच्या पाणी पुरवठ्याबाबत अजित पवार यांनी सकारात्मक सूचना केल्याने त्यांचे आभार मानले. आ क्षीरसागर यांच्या सूचना बाबत तातडीने योग्य ती…
-
खंडणी,कमरेला रिव्हालवर लावून फिराल तर मकोका लावणार -अजित पवार!
बीड -विकासकामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही, कोणाला खंडणी मागितली तर थेट मकोका लावण्यात येईल तशा सूचना मी डिपार्टमेंट ला दिल्या आहेत. पिस्टल, बंदूक लावून फिराल अन रिल्स बनवाल तर कारवाई केली जाईल असा सज्जड दम राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. बीड येथे बैठकीसाठी आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात…
-
साधा पोलीस शंभर हायवाचा मालक -आ धस यांच्या आरोपाने खळबळ!
बीड -गेल्या पंधरा वीस वर्षांपासून परळी येथेच कार्यरत असलेल्या भास्कर केंद्रे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर शंभर हायवा आहेत. अवैध धंदे करणाऱ्या सोबत त्याची पार्टनरशिप आहे, वाळू असो जी राख प्रत्येक वाहतुकीत याचा हिस्सा आहे असा आरोप करत भाजपचे आ सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यात दोनशे पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी हे वाल्मिक कराड…
-
बीडचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावा -अजित पवार!
बीड – बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याचसंदर्भात मंगळवारी (दि.२८) रोजीही आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावर अजितदादांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मुबलक प्रमाणाय पाणीसाठा…
-
सुदर्शन घुले ला पोलीस कोठडी!
केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.डिजिटल पुरावे तपासायचे असल्याचं सांगत एसआयटीने पोलीस कोठडीची मागणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटीकडून आज पोलीस कस्टडी मागणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा…
-
ज्ञानराधा मधील पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा!
बीड -महाराष्ट्र सह इतर राज्यात तब्बल 53 शाखाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून वेळेवर परत न करता ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवी लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरेश कुटे यांच्या मालमत्ता विक्रीबाबत कारवाई ला परवानगी देण्याची मागणी केली असून ही परवानगी मिळाल्यास येत्या काही महिन्यात ठेवी परत मिळण्याची…
-
जलजीवनचे 22 गुत्तेदार ब्लॅकलिस्ट!
बीड – जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या एकूण 1262 कामांपैकी 87 कामे समाधानकारक म्हणजे प्रगती 9 ते 25 टक्के प्रगती नाही आशा 33 कामे विहित कालावधीत काम प्रगतीपथावर नसल्याने वारंवार भेटी देऊन आणि सूचना देऊनही सुधारणा झाली नाही त्यामुळे 23 गुत्तेदरांना कारणे दाखवा नोटीस देऊन संबधीत कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबत नोटीस…