Category: बीड
-

साईराम अर्बन ला कुलूप ! ठेवीदारांची गर्दी !परभने स्टील सुद्धा बंद झाल्याने खळबळ !!
बीड- बीड शहरासह जिल्ह्यात तब्बल वीस शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्याने ठेवीदारामध्ये खळबळ उडाली आहे. साईराम चे मालक शाहिनाथ परभने यांच्या मालकीचे परभने स्टील हे दुकान देखील बंद असून त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ…
-

सहायक कार्यक्रम अधिकारी असणारे शेळके एक दिवसही कार्यालयाकडे फिरकले नाहीत !
बीड- समग्र शिक्षा अभियान कार्यालयामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून बेकायदेशीरपणे रुजू झालेले ऋषिकेश शेळके यांनी एकही दिवस कार्यालयात बसून किंवा जिल्हाभर फिरून आपले कर्तव्य पार पाडले नाही उलट शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे फिरत आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानली अशा शेळकेंना कुलकर्णी का पाठीशी घालत आहेत हे न उलगडणारे कोडे…
-

वर्षभरापासून मिलियाचे कानावर हात अन तोंडावर बोट !
बीड- आपल्या संस्थेतील एक शिक्षक त्याच्या अश्लील कृत्यामुळे सगळ्या गावाला माहीत होतो,त्याची पत्नीच त्याच्या विरुद्ध आवाज उठवते मात्र संबंधित संस्था त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही.यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? पण हा प्रकार घडला आहे बीडच्या अंजुमन इशात ए तालीम च्या मिलिया शाळेत.आमीर काझी या शिक्षकाच्या (सेक्सगुरु) प्रकरणात मिलियाच्या संपूर्ण मॅनेजमेंट ने कानावर हात अन…
-

सेक्सगुरु ला पाठीशी घालण्यासाठी मिलिय्या हायस्कुलची धडपड !
बीड- शहरातील प्रथितयश असलेल्या मिलिया शाळेतील शिक्षक आमीर काझी याने त्याच्या पत्नीसोबतचे तसेच इतर महिलांसोबत अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या सेक्सगुरुच्या पत्नीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हा सगळा प्रकार माहीत असून सुद्धा मिलिया हायस्कुल ने या शिक्षकाला…
-

मी स्वकष्टाचं खातो,तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- भुजबळांचा एल्गार !
अंबड- मी दोन वर्षे तुरुंगात बेसन भाकर खाल्ली,दिवाळीत सुद्धा खातो पण स्वकष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा घणाघात करत मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील ओबीसी मेळाव्यात एल्गार केला.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्य सरकार,पोलीस यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. जालना जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी…
-

बीडमध्ये सेक्सगुरु प्रकरणाने खळबळ !
बीड- शहरातील एका प्रथितयश संस्थेतील एका शिक्षकाने स्वतःच्याच पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले,गुन्हा दाखल झाला मात्र सदरील शिक्षकाने अशाच पद्धतीने इतर महिलांचे देखील व्हिडीओ तयार केले आहेत.तरीही या प्रकरणात त्याला संस्थाचालक पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीड शहरातील एका नामांकित संस्थेत नोकरीस असलेल्या शिक्षकाने आपल्या पत्नीसोबत शारीरिक…
-

महादेव मंदिराची जमीन भूमाफियाने केली हडप ! महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य !!
बीड- ग्रामीण भागातील देवस्थानच्या जमिनी राजकीय पुढारी अन कार्यकर्त्यांनी हडप केल्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली मात्र शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महादेवाच्या मंदिराची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आला आहे.बीड शहरात नगरी,रेसिडन्सी उभारणाऱ्या या भूमाफियाने आता देवाला अन त्याच्या नावावर असणाऱ्या जमिनी लुटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कृष्ण मंदिर मागील महादेवाच्या ( कलिंडेश्वर ) मंदिराची आठ ते दहा…
-

नोकरी जिल्हा परिषदेत कारभार स्वतःच्या संस्थेत बसून ! विस्तार अधिकारी शेळकेंना कुणाचे पाठबळ !!
बीड- बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पाटोदा येथे शिक्षण विस्ताराधिकारी असलेले ऋषिकेश शेळके यांची मूळ पोस्टिंग पाटोद्याला असताना त्यांची प्रतिनियुक्ती समग्र शिक्षा अभियान बीड कार्यालयात करण्यात आलेली आहे मात्र ते या ठिकाणी नोकरी करण्याऐवजी शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे करत आपले उकळ पांढरे करून घेत आहेत सरकारी नोकरी स्वतःच्या संस्थेत बसून करणाऱ्या या अधिकाऱ्याला जिल्हा परिषद…
-

आ रोहित पवार सहकुटुंब साजरा करणार बीडमध्ये पाडवा !
बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आ रोहित पवार मैदानात उतरले आहेत.स्वतः पवार हे दिवाळी पाडवा बीडमध्ये सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत साजरा करणार आहेत.आ पवार आणि आ संदिप क्षीरसागर यांच्या या उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित पवार व कुटुंब यंदाचा दिवाळी पाडवा राष्ट्रवादी काँग्रेस…
-

धनंजय मुंडे यांनी दिला आत्महत्या ग्रस्त बळीराजाच्या कुटुंबाला आधार !
परळी – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहेत. धनंजय मुंडे यांच्या सूचने नुसार कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून “शेतकरी कुटुंबास…


