Category: बीड
-

पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत !
शिरूर- लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या,पूढे मी तुमची काळजी घेईल असे म्हणत भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांची घोषणा केली होती, मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातून एकाही उमेदवारांची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.…
-

मराठा आंदोलकांनी माजी आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडला!
आष्टी- गाव चलो अभियानात चोभा निमगाव गावात पोहचलेल्या भाजपचे माजी आ भीमराव धोंडे यांच्या कार्यक्रमात मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडला. मराठा आरक्षणाच्या विषयावरून सध्या सर्वत्र वातावरण तापले असून त्याचा फटका राजकीय मंडळींना सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत…
-

दगड द्या पण जरा धडाचा आकार असलेला द्या- नाईकवाडे !
बीड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूक पटेल,मोईन मास्टर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.2019 ला झालेली चूक यावेळी होणार नाही,सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार नाही असा शब्द यावेळी कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. मंगळवारी बीड नगरपालिकेचे मा. गटनेते फारुक…
-

युवराज,जहिरने जिंकली परळीकरांची मने !
परळी – भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराजसिंग आणि जहिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत परळीत नाथ प्रतिष्ठानच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. पुढील वर्षी परळीत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मानस कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. परळीची माती ही रत्नांची खाण आहे या मातीने महाराष्ट्र व देशाला अनेक क्षेत्रात विविध रत्ने दिली आहेत.…
-

शहर पोलिसांची मोठी कारवाई !
बीड- कपड्याच्या दुकानात जायचे,दोन चार ड्रेस चोरायचे असा प्रकार करत करत तब्बल चार लाख रुपयांचे कपडे चोरणाऱ्या चोरट्याला बीड शहर पोलिसांनी अटक केले.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने या चोराच्या मुसक्या आवळल्या. जानेवारी महिन्यात सुभाष रोडवरील आर के मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानातून चार लाख रुपये किमतीचे रेडीमेड कपडे चोरी गेल्याची माहिती मिळाली…
-

लाचखोर तलाठी जेरबंद !
बीड- सातबारावर मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना दिलीप कण्हेरकर या तलाठ्यास आणि त्याच्या सहकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील तलाठी दिलीप कण्हेरकर आणि त्याचा सहकारी दिगंबर गात या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे सातबारावर मालकी हक्कात नोंद करण्यासाठी सतरा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत बीडच्या लाच लुचपत…
-

का लावले माहीत नाही पण बँकेवरील निर्बंध हटवले- आदित्य सारडा !
बीड- गेल्या 65 वर्षांपासून आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या द्वारकादास मंत्री बँकेवर आरबीआय ने निर्बंध का लावले माहीत नाही,पूर्वीच्या संचालक मंडळावर 229 कोटींच्या अपहाराचा गुन्हा का दाखल केला माहीत नाही,प्रशासकाची नियुक्ती का झाली माहीत नाही,बँकेवर राजकारणातून कारवाई झाली का,बँक राजकारणाची बळी ठरली का?माहीत नाही मात्र आरबीआय ने आता बँकेवरील निर्बंध उठवले आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य…
-

फुलारी बीडचे नवे शिक्षणाधिकारी !
बीड- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नाशिक येथून भगवान फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. तर शिक्षणाधिकारी योजना या पदावर संजय पंचगल्ले यांची नियुक्ती झाली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती नंतर माध्यमिक विभागाचे नागनाथ शिंदे यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने…
-

महासंस्कृती महोत्सवाकडे बीड करांनी फिरवली पाठ !
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर गैरहजर ! बीड- कोट्यवधी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या बीड येथील महासंस्कृती महोत्सवाकडे बीडकरांनी पाठ फिरवली.उद्घाटक म्हणून आमंत्रित असलेले पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील कार्यक्रमाला गैरहजर होते.विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन उरकण्यात आले. राज्य शासनाच्या कृषी,महिला बाल कल्याण आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने बीड येथे…
-

दुष्काळी बीड जिल्ह्यात महा सांस्कृतिक वर करोडोंची उधळपट्टी !
बीड-महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या बीड जिल्ह्यात शासन आणि प्रशासनाच्या वतीने मनोरंजनाच्या कार्यक्रमावर किमान दोन ते पाच कोटी रुपयांचा चुराडा केला जाणार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकाऱ्यांची देखील चांदी होणार आहे हे निश्चित. कायम दुष्काळ पाचवीला पूजलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.राज्याचे कृषिमंत्री हे बीड जिल्ह्यातील असले…



