Category: बीड
-

अविनाश पाठक नवे जिल्हाधिकारी!
बीड -बीड जिल्हा परिषदेचे सिइओ अविनाश पाठक यांची जिल्हाधिकारी बीड म्हणून नियुक्ती झाली आहे दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून पाठक पदभार घेतील. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या जागेवर अविनाश पाठक येणार ही चर्चा निवडणूक निकाला नंतर होती. आज शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलेले पाठक यांनी मागील वर्षी…
-

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नाला यश!भगवानगडाला चार हेक्टर जमीन देण्यास मंजुरी!
मुंबई – श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विविध विकास कामांसाठी भगवानगड ट्रस्टला लागून असलेली वनविभागाची चार हेक्टर जमीन भगवानगडाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वन विभागाकडे पाठवला होता. त्यास आज केंद्रीय वन विभागाने मान्यता दिली आहे. भगवान गडाचे महंत न्यायाचार्य, ह. भ. प. डॉ. नामदेव…
-

बोराडे, पानसबळ, शिंदे, मोमीन यांची चौकशी सुरु!
बीड -बीडचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय असा झाला आहे. बीड व शिरूर तालुक्यातील एफ डि आर च्या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र दिन वर्ष अधिकाऱ्यांनी हे प्रकरण लांबवले.मात्र काही दिवसापूर्वी या प्रकारणाची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत. बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात…
-

कुटेंवर माजलगाव मध्ये आणखी एक गुन्हा!
माजलगाव – ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवी ठेवण्यास लावून तब्बल 74 लाख रुपयांची फसवणूक केली म्हणून सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था मागील आठ महिन्यापासून बंद आहे.चेअरमन सुरेश कुटे यांच्यावर जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. बीड पोलिसांनी कुटे यांना पुण्यातून अटक केली…
-

सुरेश कुटेना पोलीस कोठडी!
बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकारणात सुरेश कुटे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी माजलगाव आणि बीड न्यायालयाने कुटे यांची केलेली अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना दिलासा दिला होता. ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये साडेतीन हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकारणी पोलिसांनी कुटेना अटक केली होती. मात्र माजलगाव न्यायालयात त्यांच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोमवारी…
-

रोज किमान 25 दुकानांना भेटी द्या, परवाने निलंबित करा, शेतकऱ्यांना न्याय द्या -कृषिमंत्री मुंडे आक्रमक!
मुंबई – राज्यात कोणत्याही बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना आता चाप बसणार असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आवश्यक असलेले बी – बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून खतांची अतिरिक्त मागणी देखील येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल. मात्र आता बी –…
-

कुटेंची अटक बेकायदेशीर!
माजलगाव -ज्ञानराधा मल्टीस्टेट अपहार प्रकरणात अटकेत असलेले सुरेश कुटे यांची अटक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आगे. त्यामुळे कुटे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यभरात पन्नास पेक्षा जास्त शाखाच्या माध्यमातून लाखभर ठेवीदारांचे तीन साडेतीन हजार कोटी रुपये गोळा करणारे आणि गेल्या आठ महिन्यापासून ठेवीदारांना एक पैसाही न देणाऱ्या सुरेश कुटे यांच्याविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
-

वीज बिल सवलतीपासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्या -मुंडे!
बीड – शासनाने जिल्हयात दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत 56 कोटी 80 लाख रुपये वीज बिल सवलत दिली. यातून वंचित राहिलेल्या 36 हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याची पूर्तता करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले. जिल्ह्यातील वीज वितरण व अनुषंगिक बाबींचा आढावा…
-

मुंडेंच्या पराभवानंतर भाजपमध्ये वादावादी!
बीड – बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासहित पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. शहरातील यंत्रणा लावण्यासाठी ऐंशी लाख रुपये आणले मात्र ते वाटपच केले नाहीत असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही भाजप मधील कुरबुरी कमी होत नसल्याचे चित्र आहे. बीड…
-

समाजकल्याण कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण!
बीड – बीडच्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला बायको अन काही महिलांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील सामाजिक न्याय भवन इमारती मध्ये असलेल्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला त्याच्या बायकोने काही महिलांना सोबत घेत मारहाण केली. सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अधिकाऱ्याने दुसरे लग्न केले असल्याने काही दिवसापासून त्याच्या घरात वाद…



