Category: बीड
-

साई अर्बन ला कुलूप!ठेवीदार हवालदिल!!
बीड -शहरातील सम्राट चौक भागात असलेल्या साई अर्बन क्रेडिट सोसायटी ला गेल्या दोन महिन्यापासून कुलूप लागल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. विशाल ढगे हा चेअरमन फरार झाल्याने जवळपास एक ते दीड कोटी रुपये अडकल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत. बीड येथील विशेष लेखा परीक्षक कार्यालयात नोकरीस असलेल्या श्रीकृष्ण ढगे यांनी मुलगा विशाल ढगे याला साई अर्बन क्रेडिट…
-

बिल फिनेल अन नॉन मेडिकल चे खरेदी घरच्या भांड्यांची!
बीड – बीड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक असणाऱ्या डॉ बडे यांचे एक एक किस्से बाहेर येत आहेत. या बडे महाशयानी स्वतःच्या घरी तांब्या पितळेची भांडी खरेदी केली अन बिल मात्र फिनेल आणि नॉन मेडिकल चे घेऊन अदा करण्यात आले आहेत. सीएस अशोक बडे यांच्या कारभाराबाबत बीडचे खा बजरंग सोनवणे यांनी देखील नाराजी व्यक्त केली…
-

जेजुरकरांचे कर्मचाऱ्यांना चावट मेसेज!महिना झाला तरी कारवाई नाही!!
बीड -बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या कारभाराला वैतागून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले आहे. या जेजुरकर महाशयानी आपल्याच कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांना चावट मेसेज पाठवल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार होऊन महिना लोटला तरी अद्याप जेजुरकर यांच्यावर कसलीच कारवाई झालेली नाही हे विशेष. राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या…
-

बुंदेलपुरा मस्जिद मध्ये हल्ला!नागरिकांकडून निषेध!
बीड -शहरातील बुंदेलपुरा भागात असलेल्या मस्जिद मध्ये नमाज साठी जाणाऱ्या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या, कुऱ्हाडी, तलवार आणि चाकूने हल्ला केला. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. पवित्र मस्जिद मध्ये घुसून हल्ला करण्याच्या प्रकाराचा मुस्लिम समाजाने निषेध केला आहे. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. पेठ बीड भागातील महेबूब खान आणि जमील गुत्तेदार यांचे…
-

बोगस कागदपत्राच्या आधारावर बीडमध्ये मिळवली नोकरी, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष!
बीड -जिल्हा परिषदेच्या कारभारात बोगस कागदपत्र सादर करून नोकरीं मिळवणे किंवा प्रमोशन मिळवण्याचे उद्योग पुन्हा डोके वर काढू लागले आहेत, याकडे प्रभारी सिइओ संगीता देवी पाटील यांनी लक्ष देऊन संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे. बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुभाष सोनवणे नावाचा एक व्यक्ती तत्कालीन डि एच ओ डॉ अमोल गित्ते यांच्या आशीर्वादाने नोकरीस…
-

निलंबित वादग्रस्त कर्मचाऱ्याला त्याच विभागात प्रतिनियुक्ती!
बीड -ज्या विभागातून तक्रारी आल्याने निलंबित करण्यात आले त्याच विभागात पुन्हा वादग्रस्त कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्ती देण्याचा प्रताप बीड जिल्हा परिषदेत घडला आहे. हा कर्मचारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मर्जीतील असल्याने हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे भ्रष्टचाराचा अड्डा झालेला आहे. या कार्यालयात दाम दिल्याशिवाय काम होत नाही अशा अनेक तक्रारी आहेत.…
-

प्रकाश सोळंके रिटायर्ड!पुतण्याकडे सोपवला वारसा!
माजलगाव -माजलगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आ प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला वारस म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. माजलगाव मतदार संघात चार टर्म आमदार असलेल्या प्रकाश सोळंके यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबाबत घोषणा केली आहे. सोळंके यांच्या नंतर यावेळी त्यांचा पुतण्या जयसिंह हा विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरणार अशी चर्चा…
-

जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!
आष्टी – तालुक्यातील टाकळी अमिया येथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः छापा घालत किमान एक हजार क्विंटल पावडर जप्त केली. बीड जिल्ह्यासह नगर, संभाजीनगर, आणि पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात दुधाची भेसळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र यावर किरकोळ कारवाई होते परंतु…
-

पाण्यावरून बीडच राजकारण तापलं!पालकमंत्र्याकडून दिशाभूल -माजी आ सलीम!!
बीड – पाणी असुनही आणि पाणी पुरवठ्याची योजना पुर्ण होवूनही केवळ वीज बिलाच्या थकबाकीपोटी बीडकरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे वीजबिल भरण्यासंदर्भात शासनस्तरावर अनेकवेळा पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने माजी आ.सय्यद सलीम यांनी केंद्राच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या महत्वकांक्षी अशा जलजीवन मिशनच्या योजनेला हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये…
-

कमिशन नाही म्हणून सलीम वर कारवाई नाही!अंधारेंचा नगर पालिकेत अंधार!!
बीड -भगवान बाबा प्रतिष्ठान शेजारी असलेल्या हिंदू स्म्शानभूमीच्या चतुसीमेत बदल करण्यासोबतच अनेक कुटाणे करणाऱ्या ट्रेसर सलीम याच्यावर कारवाई केली तर काही कमिशन भेटणार नाही किंवा परसेन्टेज भेटणार नाही म्हणून सिइओ नीता अंधारे त्याला पाठीशी घालत आहेत का? अशी चर्चा सर्वसामान्य माणसात सुरु आहे. बीड नगर परिषदेत ट्रेसर म्हणून नोकरीस असलेल्या सलीम उर्फ डिके याच्यावर अनेक…



