News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • बबन शिंदे जेरबंद!

    बबन शिंदे जेरबंद!

    बीड -शेकडो कोटी रुपयांचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट चा अध्यक्ष बबन शिंदे याला वृंदावन येथून जेरबंद केले आहे. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता. बीड सह जिल्ह्यात पाच ठिकाणी शाखांचे जाळे उभारून शिंदे याने तीनशे कोटिपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला….

  • आदित्य जिवने बीडचे सिइओ!

    आदित्य जिवने बीडचे सिइओ!

    बीड -जिल्हा परिषदेचे सिइओ म्हणून आदित्य जिवने यांची नियुक्ती झाली आहे. जिवने यांनी प्रशिक्षण कालावधी दरम्यान बीड येथे काम केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या नियुक्तीस असलेले जिवने यांच्या बदलीचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापूर्वी सिइओ म्हणून खडके यांची नियुक्ती झाली होती मात्र ते रुजू ना झाल्याने आता जिवने यांची बदली बीडला झाली आहे.

  • बीड बंद ला उस्फुर्त प्रतिसाद!

    बीड बंद ला उस्फुर्त प्रतिसाद!

    बीड -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंद ला शनिवारी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या. अंतरवली सराठी येथे गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती ढासळत आहे. सरकारने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने समाजात संताप…

  • बस -ट्रक अपघात, बंडू बारगजे यांच्यासह सहा जण ठार!

    बस -ट्रक अपघात, बंडू बारगजे यांच्यासह सहा जण ठार!

    बीड -परिवहन विभागाची बस आणि मोसम्बी घेऊन जाणारा ट्रक यांच्या भीषण अपघातात बसचालक, वाहक यांच्यासह सहा जण ठार झाले. एसटी बँक चे संचालक बंडू बारगजे यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा एक नेता म्हणून बारगजे यांची ओळख होती. या अपघातात जवळपास अठरा प्रवासी जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस…

  • बनावट नोटाप्रकरणी बीडमध्ये छापे!

    बनावट नोटाप्रकरणी बीडमध्ये छापे!

    बीड -बीड शहरात काही दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शहरातील विविध चौदा ठिकाणी छापे घातले. यामध्ये एका आरोपीस अटक केली आहे, सनी आठवले सह दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा चलनात वापरल्या प्रकरणी दोघा जणांना…

  • ‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश!

    ‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश!

    नवी दिल्ली -बीडच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची गंभीर दखल केंद्र सरकारने लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. ‘ज्ञानधारा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत….

  • ज्ञानराधाच्या ठेवीदारावर गोळीबार!

    ज्ञानराधाच्या ठेवीदारावर गोळीबार!

    बीड – तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी देशात गाजत असलेल्या बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी बाबत खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे कुटे यांच्या कंपनीला भेट देण्यासाठी गेलेल्या ठेवीदारावर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. वैजापूर तालुक्यातील काही खातेधारकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट…

  • संघाच्या संस्थेला लागली भ्रष्टाचाराची वाळवी!पाळे मुळे कोण खणून काढणार!

    संघाच्या संस्थेला लागली भ्रष्टाचाराची वाळवी!पाळे मुळे कोण खणून काढणार!

    बीड – गेल्या चार पाच दशकापासून मराठवाडा सह इतर भागात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने नावलौकिक मिळवलेल्या संघप्रणित एका शिक्षण संस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. किमान पंचवीस लाख ते जास्तीत जास्त एक कोटी पर्यंत टेबल खालून घेऊन या संस्थेतील वाहकाची जबाबदारी असणाऱ्याने करोडोची माया जमवली आहे. विशेष म्हणजे याची तक्रार संघाकडे देखील करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेत…

  • बीडला बुधवारी सुट्टी!

    बीडला बुधवारी सुट्टी!

    बीड -बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी असलेली ईद-ए-मिलाद ची सुट्टी प्रशासनाने रद्द केली असून त्या ऐवजी ही सुट्टी 18 सप्टेंबर बुधवार रोजी देण्यात आली आहे.राज्य सरकारने मुंबई आणि उपनगर मधील ईद ची सुट्टी बुधवारी दिली तसेच इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार बीडला बुधवारी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. राज्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद…

  • सॅम्पल सर्व्हे तातडीने करा, पंधरा दिवसात अग्रीम विमा द्या -कृषिमंत्री मुंडेंच्या कडक सूचना!

    सॅम्पल सर्व्हे तातडीने करा, पंधरा दिवसात अग्रीम विमा द्या -कृषिमंत्री मुंडेंच्या कडक सूचना!

    बीड-मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्व्हे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या 8 दिवसात पूर्ण करुन त्यापुढील 15 दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रीम पिक विमा मिळावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी आज बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री मुंडे…