Category: बीड
-

कुटेची एक हजार कोटीची संपत्ती जप्त!
बीड – राज्यसह परराज्यात शाखांचे जाळे उभारून चार लाख ठेवोदरांच्या साडेतीन हजार कोटींच्या ठेवीवर दरोडा घालणाऱ्या सुरेश कुटे याच्या एक हजार कोटीच्या मालमत्तेवर ईडी ने जप्ती केली आहे. कुटे याने ठेवीदारांचा पैसा स्वतःच्या उद्योगात रोखीच्या स्वरूपात वापरला असे स्पष्ट झाल्याने मनी लॉंड्रीन्ग आणि एमपीआयडी नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कुटेच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत….
-

स्थलांतरित शाळांचे पेव फुटले!
बीडमधील शाळा बंद करण्याचे आदेश! बीड -इतर जिल्ह्यातील जुन्या मंजुरी असलेल्या शाळा विकत घ्यायच्या अन त्या बीडमध्ये स्थलांतरित केल्याचे दाखवून बोगसगिरी करायची हा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. मात्र बीडच्या शिक्षण विभागाने या शाळांच्या स्थलांतरण प्रक्रियेस चाप लावला आहे. बीडमध्ये भूम तालुक्यातून स्थलांतरित केलेल्या शाळेला अमान्य करत शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत….
-

डॉ मुंडेचे पालकमंत्री मुंडेकडून कौतुक!
परळी -डॉ संतोष मुंडे आणि त्यांच्या टीमचे दिव्यांग बांधवांसाठीचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांच्यामुळे दिव्यांगाला सन्मानाची वागणूक मिळते आहे असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात कर्णबधिर दिव्यांगाना मशीनचे वाटप केले. तब्बल १००० कर्णबधिर नागरिकांना या डिजिटल श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि ३७०० पेक्षा जास्त नवीन नागरिकांनी…
-

सहकार सम्राट बांगर अडचणीत, बायकोला अटक!
बीड -बीड जिल्ह्यासह राज्यभरात सहकार सम्राट नावाने ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांचा खरा चेहरा उघडं होतं आहे. महात्मा फुले अर्बन बँकेसह चौदा सहकारी संस्था मध्ये चौदा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडं झाले आहे. बांगर यांच्यासह 41लोकांवर गुन्हे दाखल झाले असून सत्यभामा बांगर यांना अटक झाली आहे. रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर, बाळा बांगर यांनी महात्मा फुले…
-

डिसेंबर अखेर बायपासवर उड्डाणपुल करण्याचे न्यायालयाचे निर्देश!
बीड – बीड बायपासवर दिवसेंदिवस होत असलेले अपघात आणि जाणारे जीव यांची दखल आता मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून यासंदर्भातील आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला असून, डिसेंबर २०२४ पर्यंत १२ कि.मी. अंतर असलेल्या बीड शहराच्या लगत असलेल्या बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे…
-

धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी -तटकरे!
या महिन्यात लाडक्या बहिणींना तिनं हजार मिळणार -अजित पवार! परळी -समाजातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल विकास करण्यासाठी महायुतीचे हे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी येथे दिली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी परळी येथील…
-

बीडच्या सिव्हिलची सूत्र पुन्हा डॉ थोरात यांच्याकडे!बडे ठरले राजकारणाचा बळी!!
बीड -लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे आणि माजलगाव विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणारे डॉ अशोक थोरात यांची अचानक बीडच्या जिल्या शल्य चिकिस्तक पदावर नियुक्ती झाली आहे. डॉ अशोक बडे हे राजकारणाचा बळी ठरल्याची चर्चा यामुळे होतं आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात वादग्रस्त ठरलेले आणि विभागीय चौकशी सुरु असणारे डॉ थोरात यांची…
-

शेतकऱ्यांना 2400 कोटी अनुदान वाटपास सुरवात!
मुंबई – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतुन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना…
-

बीडमध्ये हवाला रॅकेट उध्वस्त!
बीड शहर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेले हवाला रॅकेट पोलिस अधीक्षक यांच्या कारवाईने उध्वस्त झाले. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या या रॅकेट कडे शहर पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते हे यावरून समोर आले आहे. बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात हवाला मार्फत कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण केली जाते हे सर्वश्रुत आहे. मात्र शहर असो कि शिवाजीनगर अथवा पेठ…
-

ईडी ची कुटेवर कारवाई, 95कोटी जप्त!
ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटींची संपत्ती जप्त बीड,छत्रपती संभाजीनगर,पुणे,मुंबई येथील मालमता जप्त बीड – ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आलीये.जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टिस्टेटने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्याप वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले…


