News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • आचारसंहिता सुरू असताना प्रमोशन साठी फिल्डिंग !

    बी एन्ड सी च्या मोमीन,शिंदेचा प्रताप ! बीड-बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक मधील शाखा अभियंता यांनी आपल्या प्रमोशनसाठी मुंबई वाऱ्या करत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना देखील हे शाखा अभियंता मुंबईत जाऊन सेटिंग लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक…

  • बीडमध्ये मंगळवारी आदर्श शिंदेचा कार्यक्रम- आ क्षीरसागर !

    बीड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपास्थीत राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी…

  • महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार- पाटील !

    बीडमधून बजरंग सोनवणे यांनी भरला अर्ज ! बीड -देशात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार आणि संविधान वाचविण्यासाठी प्रचंड प्रमाणात लाट आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या ३२ ते ३५ जागा निवडून येण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड येथे बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. लोकसभेचे उमेदवार बजरंग …

  • शिवसंग्राम च्या मेटे यांची माघार !

    बीड-शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे स्पष्ट केलं आहे. त्या बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ज्योती मेटे म्हणाल्या की, मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना…

  • बीड पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !

    307 मधील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रचारात ! बीड-जिल्हा पोलीस दलाला पैसे खाण्याचा रोग लागला की  राजकीय दबावाखाली काम करण्याची नवी पद्धत बीडच्या एसपींनी अंगवळणी पाडून घेतली आहे  अशी शंका येऊ लागली आहे .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले सत्ताधारी पक्षाचे कुंडलिक खांडे यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा असताना देखील ते उजळ माथ्याने लोकसभेच्या प्रचारात हिंडत आहेत आजी-माजी…

  • चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत मिळवले यश !

    बीड- शिरूर तालुक्यातील पाडळी येथे प्राथमिक शिक्षण घेत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत बीडीओ म्हणून नोकरी मिळवली,नोकरी करत करत यूपीएससी चा अभ्यास सुरू ठेवला,चारवेळा अपयश आले तरीही खचून न जाता पाचव्यांदा यश मिळवत आपलं लक्ष्य गाठणाऱ्या अभिजित पाखरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अभिजीत पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बीडमधील चंपावती…

  • अवकाळीच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी !

    तातडीने पंचनामे करण्याचे कृषिमंत्री मुंडेंचे आदेश ! धारूर – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या…

  • अवकाळी पाऊस ,गारपिटीने शेतकरी उध्वस्त !तातडीने पंचनामे करण्याचे आदेश !!

    बीड -जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान गुरुवारी झालेल्या गारपीटीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदत आचारसंहिता संपल्यावर मिळेल अशी माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सकाळच्या सत्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण…

  • बीडमधून अशोक हिंगेना वंचितची उमेदवारी !

    मुंबई- बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शिवसंग्राम च्या प्रमुख ज्योती मेटे यांना देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली…

  • आ सोळंकेच्या पीए ला भररस्त्यात बदडले !

    माजलगाव- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादेव सोळंके यांना रस्त्यावर बेदम चोप दिल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण प्रकरणावरून आ सोळंके यांच्या घरी झालेल्या जाळपोळ प्रकरणी आपले नाव का घेतले म्हणून सोळंके यांना मारहाण झाली. नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून वादात सापडणारे आ सोळंके यांचे पीए महादेव…