News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!

    अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!

    मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया…

  • कामे न करताच एक कोटींची बिले उचलली!बीडच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्याचा अन अधिकाऱ्यांचा प्रताप!

    कामे न करताच एक कोटींची बिले उचलली!बीडच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्याचा अन अधिकाऱ्यांचा प्रताप!

    बीड -जिल्हा परिषदेचा बांधकामं विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. कोणीही कोणतीही वर्क ऑर्डर काढायची, अधिकारी मॅनेज करायचे आणि कोट्यावधी रुपये उचलायचे. असाच एक प्रकार परळीत उघडकीस आला आहे. नेत्याच्या मागेपुढे करत त्यांची बीडला आल्यावर बडदास्त ठेवणाऱ्या सत्ताधारी पक्षातील बीडच्या एका मोठ्या कार्यकर्त्याने तब्बल एक कोटी रुपयांची बोगस कामे केली. यातील 86 लाख रुपयांची वसुली…

  • वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपीला तीन दिवसांची कोठडी!

    वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपीला तीन दिवसांची कोठडी!

    बीड -जिल्हा न्यायालयात वकील राम डोंगरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत बार कॉन्सिल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जागे झालेल्या शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने आरोपी राधाकिसन करपे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयातील एकाही वकिलांनी त्याचे वकीलपत्र नाही घेत आपली…

  • बांधकाम विभागाला झालाय पैसे खाण्याचा भस्म्या रोग!

    बांधकाम विभागाला झालाय पैसे खाण्याचा भस्म्या रोग!

    बीड-जिल्हा परिषदेच्या बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता सय्यद मोमीन आणि कर्मचाऱ्यांना पैसे खाण्याचा भस्म्या रोग झाला आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे. डेमो हाऊस प्रकरणात दोन वेगवेगळ्या वर्क ऑर्डर काढून दहा लाख रुपये घशात घालणाऱ्या या अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत आणि फर्निचर साठी सतरा लाख रुपयांच्या वर्क ऑर्डर काढल्या आहेत. शासनाच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर…

  • फडणवीस साहेब न्याय मागणे गुन्हा आहे का,आंदोलन कर्त्यांचा मंडप पोलिसांनी काढला!

    फडणवीस साहेब न्याय मागणे गुन्हा आहे का,आंदोलन कर्त्यांचा मंडप पोलिसांनी काढला!

    बीड -तब्बल चाळीस दिवसापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या जी एस टी अधिकारी सचिन जाधवर यांच्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या जाधवर कुटुंबाने उभारलेला मंडप पोलिसांनी दमदाटी करत काढून टाकला. एकीकडे चाळीस दिवस झाले तरी आरोपी अटक करण्यात यश येतं नसलेले बीड पोलीस आंदोलन करणाऱ्यांवर दमबाजी करून कसली मर्दूमकी दाखवत आहेत असा सवाल विचारला जातं…

  • वकिलांचे न्यायालयाच्या दारात आंदोलन!

    वकिलांचे न्यायालयाच्या दारात आंदोलन!

    बीड -जिल्हा वकील संघांचे सदस्यऍडरामडोंगरे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत चोवीस तास झाले तरी गुन्हा दाखल नाही केल्याच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयाच्या दारातवकिलांनी कामबंद आंदोलनकेले. बीड जिल्हा न्यायालयात आपले काम करत बसलेले ऍड राम डोंगरे यांना राधाकिसन करपे व इतरांनी मारहाण केली. विशेष म्हणजे याबाबत सर्व वकील बांधव शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र चोवीस…

  • बीडमध्ये वकिलाला मारहाण!

    बीडमध्ये वकिलाला मारहाण!

    बीड –बीड जिल्हा न्यायालयात मंगळवारी दुपारीच बारा वाजण्याच्या सुमारास मोठा राडा झाला. वकील संघांचे सदस्य असलेले ऍड राम पांडुरंग डोंगरे यांना शाहूनगर भागातील राधाकिसन करपे व इतरांनी मारहाण केली. याविरोधात तक्रार देण्यासाठी वकिलांनी पोलीस अधीक्षक आणि शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी वकील राम डोंगरे यांच्याविरोधात महिलेने तक्रार दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार…

  • जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन!

    जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन!

    बीड -ग्रामसेवक, शिक्षक, ट्रेसर यांच्यासोबत नोकरीस लागलेल्या आणि वेतन निश्चिती झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर मात्र गेल्या पन्नास साठ वर्षात अन्यायचं झालेला आहे. सर्वांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढले मात्र जी p कर्मचारी तुटपुंज्या वेतणावर आजही काम करत आहेत. या विरोधात बीड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन करत धरणे केले. वेतन त्रुटी तात्काळ दूर करून…

  • डेमो हाऊसचे बांधकाम :दुखणं म्हशीला अन इंजेक्शन पखालीला असा जिल्हा परिषदेचा कारभार!

    डेमो हाऊसचे बांधकाम :दुखणं म्हशीला अन इंजेक्शन पखालीला असा जिल्हा परिषदेचा कारभार!

    बीड -जिल्हा परिषदेच्या आवारात बांधण्यात आलेले आणि एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश काढून भ्रष्टाचार करून लाखो रुपये पचवणाऱ्या डेमो हाऊस बाबत बातम्या आल्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सय्यद मोमीन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे. त्यांनी वरिष्ठाना दिलेला खुलासा म्हणजे दुखणं म्हशीला अन इंजेक्शन पखालीला असाच प्रकार आहे. यातून त्यांनी हे…

  • मंडपात परीक्षा, केंद्रप्रमुखांवार कारवाई, मात्र गटशिक्षणाधिकारी मोकाट का?

    मंडपात परीक्षा, केंद्रप्रमुखांवार कारवाई, मात्र गटशिक्षणाधिकारी मोकाट का?

    बीड – दहावीच्या परीक्षा चक्क मंडप टाकून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यात उघडकीस आला याप्रकरणी केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत शिक्षण अधिकारी प्रिया राणी पाटील यांनी दिले. या प्रकरणात केंद्रप्रमुख जेवढे जबाबदार आहेत तेवढेच गटशिक्षणाधिकारी समंदर खान आणि शिक्षण विस्तार अधिकारी हे देखील जबाबदार असताना शिक्षणाधिकारी पाटील मॅडम या आपल्या अधिकाऱ्यांना…