News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या!

    सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या!

    बीड -पेठ बीड भागातील एका छोट्या व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हा सावकार राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. मयत व्यापाऱ्याच्या खिशात सहा पानी चिठी सापडली असून त्यात सावकारांचे नाव असल्याचे कळते. पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खाजगी…

  • पवार, खाटोकर ला न्यायालयीन कोठडी!

    पवार, खाटोकर ला न्यायालयीन कोठडी!

    बीड -उमाकिरण क्लासेस अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शहरातील उमाकिरण क्लासेस मधील एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने मागील वर्षभरात तिच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसात धाव घेतली होती. या प्रकरणी प्रा विजय पवार आणि प्रा प्रशांत खाटोकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29…

  • पवार, खाटोकर ला पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी!

    पवार, खाटोकर ला पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी!

    बीड -उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी पहिल्या तारखेला केवळ तीनच दिवसांची कोठडी मागितल्याने आरोप झाले होते. उमाकिरण क्लासेस मधील एका सतरा वर्षीय विदयार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पवार आणि खाटोकर यांच्याविरुद्ध पोस्को दाखल झाला होता. या दोघांना अटक झाल्यानंतर ऐक जुलै…

  • बीड प्रकरणी मुंडेनी घेतली सीएम, डिसिएम ची भेट!

    बीड प्रकरणी मुंडेनी घेतली सीएम, डिसिएम ची भेट!

    मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांची विधानभवन मुंबई येथे भेट घेऊन या प्रकरणात बीड जिल्हा बाहेर सेवेत असलेल्या एका अनुभवी आय पी एस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या…

  • उमाकिरण प्रकरणात पोलीस तपासावर धनंजय मुंडेना शंका!

    उमाकिरण प्रकरणात पोलीस तपासावर धनंजय मुंडेना शंका!

    बीड : बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेला प्रकार दुर्दैवी व संतापजनक आहे. यातील आरोपी विजय पवारला राजकीय बळ आहे, बीडचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या आश्रयाने व वरदहस्ताने या लोकांची इथपर्यंत मजल गेली आहे. या प्रकरणी व्यवस्थित तपास होऊन याधीही असे गुन्हे या लोकांनी केले आहेत का, याची सविस्तर चौकशी होणे अपेक्षित आहे, म्हणून आपण या प्रकरणी…

  • पवार, खाटोकर ला दोन दिवसांची पोलीस कोठडी!

    पवार, खाटोकर ला दोन दिवसांची पोलीस कोठडी!

    बीड -अल्पवयीन विद्यार्थिनीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले प्रा विजय पवार आणि प्रा प्रशांत खाटोकर या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारे घटना तीन दिवसापूर्वी उघडकीस आली प्राध्यापक विजय पवार प्राध्यापक प्रशांत खाटोकर या दोघांनी आपल्याला लज्जा येईल असे कृत्य करून आपला शारीरिक आणि मानसिक…

  • असंगाशी संग पोलिसांशी गाठ!

    असंगाशी संग पोलिसांशी गाठ!

    पवार प्रकरणात अनेकांची युनिक चौकशी! बीड – उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांनी या संकुलातील आणि आसपासच्या अनेक क्लासेस चालकांची दोन दिवस कसून चौकशी केली यातील एक युनिक प्राध्यापक हा गुन्हा दाखल झाला त्यावेळी आणि नंतर या दोन्ही आरोपींसोबत एका बर्थडे पार्टी मध्ये एन्जॉय करत होता त्यामुळे या युनिक प्राध्यापकाची बारा तासापेक्षा…

  • फरार पवार, खाटोकर जेरबंद!

    फरार पवार, खाटोकर जेरबंद!

    बीड – आपल्याच कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या वर्षभरापासून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खाटोकर या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बीड नजीक रात्री उशिरा अटक केली. बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे शिकणार आहे का 17 वर्षे विद्यार्थिनीने प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खाटोकर…

  • उमाकिरण शैक्षणिक संकुल सील!तगडा पोलीस बंदोबस्त तैनात!

    उमाकिरण शैक्षणिक संकुल सील!तगडा पोलीस बंदोबस्त तैनात!

    बीड – शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन शिक्षकांनी केलेल्या गैर कृत्याच्या नंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पोलीस प्रशासनाने उमाकिरण संकुलाला कुलूप ठोकले असून सर्व क्लासेसला सुट्टी देत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात…

  • खाजगी कोचिंगच्या दोघांवर पोस्को दाखल!

    खाजगी कोचिंगच्या दोघांवर पोस्को दाखल!

    बीड – शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथील दोन खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उघड झालेल्या या प्रकाराने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे. बीड शहरातील मध्यवस्तीत असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस चालतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात…