Category: बीड
-
संतोष साठी लाखोंचा असंतोष रस्त्यावर!
बीड – मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, वाल्मिक कराड ला अटक झालीच पाहिजे, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या मागण्यासाठी बीडमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. संतोष ला न्याय द्या, वाल्मिक ला अटक करा, वाल्मिक कराड च्या संपत्तीची चौकशी करा असे पोस्टर घेऊन महिला,…
-
वाल्मिक कराड यांच्या पत्नीसह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांची सीआयडी कडून चौकशी!
बीड – अवादा कंपनीला दोन कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सी आय डी कडून कसून चौकशी करण्यात आली. बीड शहर पोलीस ठाण्यात या सर्वांची चौकशी झाली. मसाजोग येथील अवादा कंपनीकडे दोन कोटी रुपये खंडणी मागितल्या…
-
आ धस यांनी वाल्मिक कराड, मिटकरी, मुंडेना धुतलं!
बीड -महादेव एप च्या माध्यमातून परळीतील कोणाचे नऊ अब्ज रुपये अडकले, त्याला आका ने कस बाहेर काढलं इथपासून ते प्राजक्ता माळी च परळी कनेक्शन काय आहे इथपर्यंत भाजपचे आ सुरेश धस यांनी आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस चे आ अमोल मिटकरी यांनी आपल्या नादाला लागू नये असा इशारा देताना धनंजय मुंडे यांनी आता तरी हवेतून खाली…
-
देशमुख हत्या प्रकरणी शनिवारी मोर्चा!
बीड – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी येत्या शनिवारी 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये…
-
दहशतीतून बाहेर पडा -शरद पवार!
केज -संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्राला न शोभणारी घटना आहे. आपल्याला दहशतीतून बाहेर पडावे लागेल. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कुटुंबाने संरक्षणाची मागणी केली. संतोष यांच्या मुलींच्या…
-
नवनीत कांवत नवे एसपी!
बीड -बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यात अपयश आल्याच्या कारणावरून तडकाफडकी बदली झालेल्या एसपी अविनाश बारगळ यांच्या जागी नवे एसपी म्हणून नवनीत कांवत यांची नियुक्ती झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे डिसिपी असणारे नवनीत कांवत हे 2019 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बीडचे एसपी बारगळ हे चार महिन्यापूर्वी बीडला रुजू झाले होते. मात्र जिल्ह्यातील कायदा…
-
चारच महिन्यात उचलबांगडी!बारगळ यांचं नेमकं काय चुकलं!
बीड -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यस्थेला जबाबदार धरून एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली. अवघ्या चार महिन्यापूर्वी जॉईन झालेल्या बारगळ यांचं नेमकं चुकलं काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे. जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करणे, खंडणी, खून, मोकाट वाळू माफिया आणि वाढता राजकीय हस्तक्षेप त्यांच्या उचलबांगडी ला कारणीभूत…
-
गोळीबार प्रकरण, तीन आरोपी जेरबंद!
बीड -शहरातील बार्शी नाका भागात असलेल्या प्रकाश आंबेडकर नगर मध्ये गोळीबार करून फरार झालेल्या तीन आरोपीना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. बीड शहरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या विश्वास डोंगरे याच्या घरी जाऊन अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि इतरांनी बेधुंद गोळीबार केला होता. यांध्ये डोंगरे हे जखमी झाले होते. या प्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा…
-
फरार विष्णू चाटे जेरबंद!
बीड -मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला बीड पोलिसांनी जेरबंद केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपीना अटक झाली आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ता. नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खुन झाला होता. नवव्या दिवशी फरारी चाटेला…
-
मस्साजोग प्रकरणी आ संदीप क्षीरसागर आक्रमक!
नागपूर – मस्साजोग येथील दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरनातील नराधम आरोपी अजूनही मोकाटच आहेत. अतिशय विदारक प्रकरण असताना यातील आरोपी अटक होत नाहीत. प्रशासनाकडून या प्रकरणात दिरंगाई कशाबद्दल होत आहे? असा सवाल उपस्थित करत मस्साजोग प्रकरणी, नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होत विधिमंडळ परिसरात आंदोलन केले. केज तालुक्यातील मस्साजोग…