Category: राजकीय
-

प्रचंड रस्सीखेच अन महायुतीकडून डॉ योगेश फायनल!
बीड – महायुतीमध्ये बीड जिल्ह्यात एकमेव असलेल्या बीड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत कोण उमेदवार असणार यावर अखेर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ योगेश क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. रात्री दोन वाजता क्षीरसागर यांना एबी फॉर्म देण्यात आला. बीड जिल्ह्यात सहापैकी एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी…
-

आष्टीत सुरेश धस,माळशिरस मध्ये राम सातपुते!
मुंबई -भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस चे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी कट करून सुरेश धस यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. माळशिरस मतदारसंघातून आ राम सातपुते यांना संधी दिली आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून आष्टीच्या जागेवरून वाद सुरु होता. या ठिकाणी विद्यमान आ…
-

संदीप क्षीरसागर जरांगे पाटलांची भेट!
बीड – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आ सय्यद सलीम, जावेद कुरेशी होते. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा आणि उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील अनेक मंत्री, आमदार, इच्छुक उमेदवार…
-

धनंजय मुंडेंच्या विरोधात संजय दौण्ड!
परळी – राज्याचे लक्ष लागलेल्या आणि शरद पवार यांनी प्रतिष्ठा केलेल्या परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांचेच सहकारी माजी आ संजय दौण्ड यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. भेटली तर तुतारी नाहीतर अपक्ष अशी भूमिका दौण्ड यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या हिटलीस्टवर असलेल्या नेत्यात धनंजय मुंडे यांचा सर्वात…
-

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत विजयसिंह पंडिताना स्थान!
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शुक्रवारी सकाळी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, गेवराईतून विजयसिंह पंडित यांना तर लोहा कंधार मधून भाजपचे माजी खा प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी शिरुर – ज्ञानेश्वर कटकेतासगाव – संजयकाका पाटीलइस्लामपूर- निशिकांत पाटीलअणुशक्तीनगर- सना मलिकवांद्रे पूर्व- झिशान सिद्दिकीवडगाव शेरी – सुनील टिंगरेलोहा-कंधार- प्रतापराव…
-

जयदत्त क्षीरसागर यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रवेश?
बीड -बीडचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या दृष्टीने मुंबईत हालचालीना वेग आला आहे. त्यांच्यासोबत भाजप नेते रमेश आडसकर हे देखील प्रवेश करणार आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चाळीस वर्षेपासून सक्रिय असलेले माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षांकडून…
-

काँग्रेसीची यादी जाहीर!
मुंबई -अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षप्रमाणे विद्यमान आमदारांना स्थान दिलेले आहे. तर वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने परंरागत साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली…
-

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यादी जाहिर!बीड वेटिंगवर!
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपली 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्यांमध्ये बीड जिल्ह्यातून महेबूब शेख (आष्टी )आणि पृथ्वीराज साठे (केज )यांचा समावेश आहे. तर पक्षफुटी नंतरही निष्ठावंत राहिलेल्या संदीप क्षीरसागर यांना मात्र पक्षाने वेटिंग वर ठेवले आहे. क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाल्याने आज कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता मात्र यादीत नाव ना आल्याने…
-

आईचं औक्षण, वडील, काकांचे दर्शन अन लाडक्या बहिणींच्या साक्षीने धनंजय मुंडेनी भरला अर्ज!
परळी -राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या आईकडून औक्षण करून घेत वडील पंडितरावं मुंडे, काका गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीच दर्शन घेत प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करत लाडक्या बहिणी पंकजा अन प्रीतम यांच्या साक्षीने विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.जनतेची सेवा अखंडपणे सुरु आहे, त्यामुळे जनता आपल्या पाठीशी आशीर्वाद उभा करेल असा विश्वास त्यांनी…
-

कोविड काळात कपड्याच्या व्यापाऱ्याला कोट्यवधींची कामे !मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा !!
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्यावर अक्षरशः शरसंधान केले.कोविड च्या काळात एका कपड्याच्या व्यापाऱ्याला कशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.आम्हाला खोके सरकार म्हणणाऱ्यानी आपली घर कशी भरली हे त्यांनी यावेळी सभागृहासमोर मांडले. आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्या नावाचा उल्लेख करत शिंदेंनी…


