News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • ऑनलाईन बदल्याची वेबसाईट बंद!

    ऑनलाईन बदल्याची वेबसाईट बंद!

    संवर्ग चार च्या शिक्षकांचे हाल! बीड- सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या शिक्षकांच्या बदल्या होत असताना सर्वात जास्त अन्याय जर कोणावर होत असेल तर तो संवर्ग चारच्या शिक्षकांवर. ज्या शिक्षकांना कोणीही वाली नाही असे सर्व शिक्षक मायबाप सरकारने संवर्ग चारच्या यादीत ढकलले आहेत. त्यात पुन्हा बीड जिल्ह्यातील जवळपास साडेतीन हजार संवर्ग…

  • शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेतखाली एस आय टी गठीत!

    शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेतखाली एस आय टी गठीत!

    अब तेरा क्या होगा नाना! बीड – राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती प्रकरणात राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल यासाठी गठीत केली असून या निर्णयामुळे संस्थाचालक बोगस शिक्षक आणि शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांचे धाबे दणाणले आहेत. कितीही तक्रारी झाल्या आणि बातम्या आल्या तरीही आम्ही सगळं मॅनेज करू शकतो…

  • वृक्ष लागवड म्हणजे थुक्याला थुका लावण्याचा उद्योग!

    वृक्ष लागवड म्हणजे थुक्याला थुका लावण्याचा उद्योग!

    तुतीची सात लाख झाडे लावून दादा कसलं वृक्षारोपण करणारं! दादा धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला कळलं कि तुती सुद्धा वृक्ष आहे! बीड – शासनाच्या योजना कागदावर कशा राबवायच्या याचा मूर्तीमंत उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी बीड जिल्ह्यात तीस लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे मात्र यामध्ये सात लाख वृक्ष ही…

  • दहावी पास आहात, सरकारी नोकरीसाठी अर्ज करा!

    दहावी पास आहात, सरकारी नोकरीसाठी अर्ज करा!

    मुंबई – केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाले असून तुम्ही जर का दहावी पास असाल तर नक्की ही संधी सोडू नका तब्बल ५००० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 4887 पदांसाठी होत आहेत. आता अजिबात उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास…

  • तीन बोगस शिक्षकांना अटक!

    तीन बोगस शिक्षकांना अटक!

    बीड -नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गुरुवारी दोन शिक्षणाधिकारी यांना अटक झाल्यानंतर एस आय टी ने शुक्रवारी तीन शिक्षकांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर शिक्षक घोटाळ्याची व्याप्ती पाहता राज्यभरात एस आय टी चौकशीत हजारो बोगस शिक्षक भरती झाल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे. सतीश विजय पवार (वय ३४, रा. दिग्रस, यवतमाळ, हल्ली मुक्कास…

  • बोगस शिक्षक भरती :दोन शिक्षणाधिकारी जेरबंद!

    बोगस शिक्षक भरती :दोन शिक्षणाधिकारी जेरबंद!

    बीड -नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना एस आय टी ने अटक केली आहे. या दोघांनी मिळून तीनशे पेक्षा जास्त बोगस शालार्थ आयडी तयार करून शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे. राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी कथित घोटाळा…

  • बाबरी, राजाभाऊ मुंडेंचा अजित दादांकडे प्रवेश!

    बाबरी, राजाभाऊ मुंडेंचा अजित दादांकडे प्रवेश!

    माजलगावचे आ प्रकाश सोळंके यांचा पुढाकार! बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना देशोधडीला लावून बँक बुडवणाऱ्या राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांचा मोठा प्रवेश सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मुंडे पिता पुत्र हे अजित दादांकडे प्रवेश करणार असल्याने…

  • नोकरदार महिला, पुरुषांनी घेतला लाडक्या बहीण योजनेचा लाभ!

    नोकरदार महिला, पुरुषांनी घेतला लाडक्या बहीण योजनेचा लाभ!

    बीड -विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने जाहिर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी नोकरी करणाऱ्या महिला तसेच तब्बल चौदा हजार पुरुषांनी घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने या बोगस लाभार्त्यांवर कारवाई सुरु केली आहे. याशिवाय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे १४ लाख महिला शेतकरी, ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांचा लाभ दरमहा…

  • जातीच्या आडून राजकारण केले नाही -धनंजय मुंडे!

    जातीच्या आडून राजकारण केले नाही -धनंजय मुंडे!

    ठाणे – मी राजकारणात आणि सामाजिक जीवनात सक्रिय झाल्यापासून आजपर्यंत माझ्यावर अनेक संकटे, अनेक संघर्ष आले, त्यांना मी सामोरे गेलो. मात्र यावेळी सलग २०० दिवस माझी मीडिया ट्रायल चालवली गेली. मी, माझे आई – वडील, माझी मुले – बाळे, माझी जात, माझा जिल्हा, माझी माती या सगळ्यांची बदनामी केली गेली. त्या सर्व बदनामीला मी संयमाने…

  • कागदपत्र अपलोड करा अन्यथा कारवाई!

    कागदपत्र अपलोड करा अन्यथा कारवाई!

    बोगस शिक्षक आणि संस्थाचालकांना धडकी! बीड -बोगस शिक्षक भरती प्रकरणात दोषी असलेल्या शिक्षक आणि संस्थाचालकांना धडकी भरवणारा आदेश शिक्षण आयुक्त यांनी काढला आहे. 2012 ते 2025 या काळात भरती झालेल्या सर्व शिक्षक, कर्मचारी यांची कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कागदपत्र अपलोड न केल्यास कारवाई केली जाईल असा ईशारा सचिन्द्र प्रताप सिंग यांनी दिला…