News & View

ताज्या घडामोडी

Category: देश-विदेश

  • नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि स्वामिनाथन यांना भारतरत्न !

    नवी दिल्ली- भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि शेतीतज्ज्ञ स्वामिनाथन यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.सरकारने यापूर्वी माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा…

  • शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर शरद पवार यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नवे नाव दिले आहे.अद्याप चिन्ह मिळालेले नाही . शरद पवार यांच्याकडून ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नवे नाव…

  • गेवराई नजीक भूकंप, बीड जिल्ह्यात हादरे ?

    बीड- बीड जिल्ह्यातील काही भागात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी मोठा आवाज झाला.भूगर्भातील हालचालीमुळे हा प्रकार झाला असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे मात्र व्हॉल्कानो डिस्कव्हरी या वेबसाईट ने हा भूकंप असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.गेवराई मध्ये हा भूकम्पाचा केंद्रबिंदू असल्याचा दावा या वेबसाईट ने केला आहे.या भूकम्पाचे हादरे नगर जिल्ह्यातील पाथर्डी,आरणगाव आणि नगर मध्ये…

  • राष्ट्रवादी अजित पवारांची!शरद पवार यांना मोठा धक्का !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार यांच्याकडे राहतील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सहा सात महिन्यांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या चाळीस सहकारी आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काका पुतण्या मध्ये मोठा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला….

  • मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल !

    नवी दिल्ली- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला.काँग्रेसच्या काळात बेरोजगारी,महागाई वाढली आम्ही मात्र गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रोजगारांची निर्मिती केली. जनतेचा आमच्यावर अतूट विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एनडीए 400 पार जाईल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की,आमच्या सरकारने शेकडो कायदे रद्द केले, अमृत भारत आणि…

  • लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न !

    नवी दिल्ली- भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.स्वातंत्र्य प्राप्ती पासून ते आजपर्यंत म्हणजेच पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सक्रिय राजकारणात सहभाग असलेल्या अडवाणी यांना हा बहुमान मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लालकृष्ण अडवाणी हे  इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात…

  • बीडच्या सचिनने ठोकलं शतक !

    नवी दिल्ली- अंडर 19 क्रिकेट वल्ड कप मध्ये बीडच्या सचिन धस याने पदार्पणातच शतक ठोकत नेपाळ विरुद्ध मोठी धावसंख्या उभारत भारताचा डाव सावरला . नेपाळ विरुद्ध सचिन धस याच्यानंतर उदय याने शतक ठोकलं. उदय आणि सचिन या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळसमोर 298 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून…

  • महिला,कृषी विभागासाठी अर्थसंकल्प मध्ये मोठी तरतूद !

    नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि महिलांसाठी विशेष योजनेची घोषणा केली.पन्नास मिनिटात त्यांनी आपलं भाषण पूर्ण केले.जुलै 2024 मध्ये मोदी सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निर्मला सीतारामन यांनी म्हटले की,वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये…

  • मंदार पत्की यवतमाळ चे सीईओ !

    मुंबई- राज्य शासनाने 17 आयएएस आणि 43 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात बीडचे सुपुत्र मंदार पत्की यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे,बीडचे पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची कोल्हापूर येथून बदली झाली असून अमोल येडगे यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. नितीन पाटील (IAS:MH:2007) विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र,…

  • लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !

    नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी…