News & View

ताज्या घडामोडी

Category: क्राईम

  • लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    बीड- कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या आपल्याच साहेबांचे पगार बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजी नगर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयात नोकरीस असलेले कार्यकारी अभियंता यांच्याकडे जून ते ऑक्टोबर 2023 या पाच महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी प्रत्येक महिन्याचे दोन हजार याप्रमाणे दहा हजार…

  • नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    बीड- शहरातील सुभाष रोड,माळीवेस भागात नाल्यांची साफसफाई सुरू असताना जेसीबीच्या खोऱ्यात चक्क मानवी मृतदेह आल्याने खळबळ उडाली.पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे.बीड शहरातील सुभाष रोडवर असलेल्या नेहरू नगर च्या मोठ्या नाल्याची जेसीबी मार्फत साफसफाई सुरू होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या खोऱ्यात…

  • विशाल साडी सेंटर फोडले !

    विशाल साडी सेंटर फोडले !

    बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार…

  • लाचखोर उपजिल्हाधिकारी ताब्यात !

    लाचखोर उपजिल्हाधिकारी ताब्यात !

    बीड- तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागून पाच हजार रुपये घेताना बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.निवृत्त मंडळ अधिकारी सरवदे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागाच्या लाचखोरांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या घराचा पाच लाख…

  • निलंबित शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग !

    निलंबित शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग !

    बीड -जिल्हा परिषदेने केलेल्या निलंबन कारवाई मध्ये सहभाग असल्याच्या संशयाने राग मनात धरून आपणास सहा महिन्यापासून त्रास देणाऱ्या शिक्षकांनी घराच्या पाठीमागे येऊन विनयभंग केल्याची तक्रार धारूर येथील एका महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे या संदर्भात धारूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. धारूर तालुक्यातील रमेश विष्णू नखाते रा. आवरगाव ता. धारूर याने अंजनडोह केंद्राचे तत्कालीन…

  • मोहोळ हत्याकांडात दोन वकिलांचा सहभाग !

    मोहोळ हत्याकांडात दोन वकिलांचा सहभाग !

    आठवडाभरापासून प्लॅनिंग, मामा ने केला गेम ! पुणे- कुख्यात डॉन शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी अवघ्या आठ तासात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना जेरबंद केले आहे.या आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे.अवघ्या महिना भरापूर्वी गँग मध्ये सहभागी झालेल्या मुन्ना पोळेकर ने मामा च्या सांगण्यावरून हा गेम वाजवला.दोन वकिलांनी आठवडाभरपासून याचे प्लॅनिंग केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या…

  • जामिनावर सुटताच गर्भपाताचा धंदा सुरू ! गेवराईत मोठ्या कारवाईने खळबळ !!

    जामिनावर सुटताच गर्भपाताचा धंदा सुरू ! गेवराईत मोठ्या कारवाईने खळबळ !!

    गेवराई- काही महिन्यांपूर्वी गेवराई शहरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटलेल्या नर्सने पुन्हा तोच उद्योग सुरू केला.जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कारवाईने हा काळा धंदा गुरुवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यात आजही अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. गेवराई शहरातील…

  • मिलिया प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय ! सीआयडी चौकशीची मागणी –

    मिलिया प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय ! सीआयडी चौकशीची मागणी –

    बीड- शहरातील अंजुमन ए इशात तालीम या संस्थेच्या शाळेत आमेर काझी नावाच्या शिक्षकाने महिला शिक्षिकांसोबत अश्लील चाळे करून त्याची चित्रफीत पॉर्न साईट ला विकली.या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्याला अटक झालेली नाही,त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे….

  • अखेर आमेर काझीवर गुन्हा दाखल ! न्यूज अँड व्युजच्या पाठपुराव्याला यश !!

    अखेर आमेर काझीवर गुन्हा दाखल ! न्यूज अँड व्युजच्या पाठपुराव्याला यश !!

    बीड- अंजुमन इशात ए तालीम या संस्थेच्या मिलिया शाळेत आमेर काझी या शिक्षकाने शाळेतील काही महिला शिक्षिकासोबत शाळेच्या वर्गखोली मध्ये सेक्स केल्याचे प्रकरण न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणले होते.गेल्या महिनाभर पासून न्यूज अँड व्युजने हा विषय लावून धरला होता.अखेर आमच्या पाठपुराव्याला यश आले आहे.मिलिया शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून आमेर याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस…

  • उशिरा का होईना पाटलांना एसपी नी जागा दाखवली !

    उशिरा का होईना पाटलांना एसपी नी जागा दाखवली !

    बीड- गुटखा असो की मटका अथवा कोणतेही अवैध धंदे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यासाठी नावाजलेले बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना तडकाफडकी कंट्रोल रुमला अटॅच करण्यात आले आहे.रिक्षाचालकाकडून लाच घेण्याचा प्रकार ठाणे प्रमुख म्हणून पाटील यांना भोवला आहे.पाटील यांच्यावर उशिरा का होईना कारवाई करत एसपी ठाकूर यांनी त्यांना जागा दाखवल्याची चर्चा होत आहे….