Category: माजलगाव
-
दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य अपात्र !
बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या…
-
अप्पा जाधवची हकालपट्टी ! धोंडू पाटलांचे पद काढले !!
बीड- शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या बीडच्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचे संपर्कप्रमुख पद काढून घेण्याची कारवाई पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी केली आहे बीडमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शिवसेनेत पैसे घेऊन पदे वाटले जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे शिवसेनेच्या वतीने राज्यभरात…
-
वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!
बीड- राज्यातील ज्या विनाअनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर झाले आहे,त्यांचे प्रस्ताव तपासणीसाठी बीडच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात सध्या जोरात दुकानदारी सुरू आहे.कुलकर्णी,शिंदे,सोनवणे,शेळके,राऊत,हजारे,काकडे,खटावकर या सगळ्यांनी किमान पन्नास आणि कमाल दोन लाखाचा रेट काढल्याने संस्थाचालक बेजार झाले आहेत. बीड जिल्ह्यातील ज्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे अशा किंवा ज्यांना…
-
झुकेगा नही साला म्हणणारे अजित पवार उच्च न्यायालयात गुडघ्यावर आले !
बीड- माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलात तरीही मी निर्णय बदलणार नाही अस म्हणत झुकेगा नही साला म्हणणारे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना उच्च न्यायालयात गुडघ्यावर टेकत माघार घ्यावी लागली.आपल्या हेकेखोर आणि मनमानी स्वभावामुळे 19 गावातील टेंडर प्रक्रिया रद्द करून मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्याचा पवार यांचा घाट न्यायालयाने उधळून लावला.अखेर जुनीच प्रक्रिया…