Category: महाराष्ट्र
-
वादग्रस्त तहसीलदार मरकडं यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र बोगस!
बीड – नाशिकचे तहसीलदार बाळू मरकड यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र देखील बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यासहित आठ अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी सुरु असून लवकरच एम पी एस सी कडून कारवाई होण्याची शक्यता आहे. तथाकथित पूजा खेडकर प्रमाणेच, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत राज्यसेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी पदरात पाडून घेणाऱ्या बाळू मरकड याने त्यासाठी केलेले एक-एक…
-
पूजा खेडकर नंतर नाशिकच्या तहसीलदार यांचे प्रमाणपत्र बोगस!
बीड -. वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर प्रकारणानंतर आता नाशिकचे तहसीलदार बाळू मरकड यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघडकीस आले आहे, यनिमित्ताने नाशिक जिल्हा परिषदेने सर्वच कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र ची तपासणी सुरु केली आहे, त्यात 60पेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले…
-
कमिशन नाही म्हणून सलीम वर कारवाई नाही!अंधारेंचा नगर पालिकेत अंधार!!
बीड -भगवान बाबा प्रतिष्ठान शेजारी असलेल्या हिंदू स्म्शानभूमीच्या चतुसीमेत बदल करण्यासोबतच अनेक कुटाणे करणाऱ्या ट्रेसर सलीम याच्यावर कारवाई केली तर काही कमिशन भेटणार नाही किंवा परसेन्टेज भेटणार नाही म्हणून सिइओ नीता अंधारे त्याला पाठीशी घालत आहेत का? अशी चर्चा सर्वसामान्य माणसात सुरु आहे. बीड नगर परिषदेत ट्रेसर म्हणून नोकरीस असलेल्या सलीम उर्फ डिके याच्यावर अनेक…
-
भाजपने मराठ्यांना आरक्षण दिल तर पवरांनी घालवले -शहा!
पुणे -राज्यात ज्या ज्या वेळी भाजपचं सरकार येत त्या त्या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत मात्र शरद पवार यांच्या काळात आरक्षण घालवल जातं अशी टीका करत पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत अशी बोचारी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. पुणे येथे आयोजित भाजप कार्यकर्ते…
-
पूजा खेडकर वर गुन्हा दाखल!
मुंबई -वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस ऑफिसर पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. युपीएससी ने पूजा विरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसेच तिचे प्रशिक्षण रद्द करत उमेदवारी रद्द का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाची…
-
पूजा खेडकर वर मोठी कारवाई!
मुंबई -वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्यात आला आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली. 23 जुलै पूर्वी मसूरी येथील…
-
पवार – फडणवीसांची पॉवर बँक!
लक्ष्मीकांत रुईकर! एकाचवेळी स्वपाक्षातील नेत्यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यासोबत सुद्धा सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे अन सत्ता असो कि नसो जनसेवेत गुरफटून राहायचे हे कसब राजकारणात फार थोड्या लोकांना जमते, पण ज्याला जमते तो जननेता किंवा मास लीडर झाल्याशिवाय राहत नाही हे ही तेवढेच खरे आहे. असाच एक मास लीडर अर्थात ओबीसी नेता म्हणजे धनंजय पंडितरावं मुंडे होय….
-
पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!
मुंबई -विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांच्यासह पाचही जागेवर विजय मिळवला आहे, महायुतीला ऐकून नऊ जागावर विजय मिळाला तर महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. शेकाप चे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवारपंकजा मुंडेपरिणय फुकेअमित बोरखेयोगेश टिळेकरसदाभाऊ खोत,शिवसेना (एकनाथ शिंदे )भावना गवळीकृपाल तुमणे,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)राजेश विटेकरशिवाजीराव…
-
पंकजा मुंडे विधानपरिषदेवर!
मुंबई -भारतीय जनता पक्षाच्या सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे, त्यांच्यासह पाच जणांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. महाराष्ट्र विधानपरिषद साठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर,डॉ परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचे…
-
धनंजय मुंडेंच्या प्रयत्नाला यश!भगवानगडाला चार हेक्टर जमीन देण्यास मंजुरी!
मुंबई – श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विविध विकास कामांसाठी भगवानगड ट्रस्टला लागून असलेली वनविभागाची चार हेक्टर जमीन भगवानगडाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वन विभागाकडे पाठवला होता. त्यास आज केंद्रीय वन विभागाने मान्यता दिली आहे. भगवान गडाचे महंत न्यायाचार्य, ह. भ. प. डॉ. नामदेव…