Category: परळी
-
कृषी अधीक्षक जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष!
बीड -बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या कारभाराला कंटाळून कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे, जे सेक्शन दिले आहे त्या व्यतिरिक्त इतर कामे सांगणे, कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा नामंजूर करणे, कर्मचाऱ्यांना अर्वांच्च भाषेत बोलणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध होत्या. कर्मचाऱ्यांनी…
-
ना. मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत भरगच्च कार्यक्रम!
परळी वैद्यनाथ – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व परळीचे लाडके आमदार धनंजय मुंडे यांचा 15 जुलै हा जन्मदिवस असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शहरातील मलकापूर रोड येथे स्थित असलेल्या जे के फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे. सकाळी 11:30 पासून धनंजय मुंडे हे जेके…
-
शरद पवार गटाचे बबन गित्तेवर गुन्हा दाखल!
परळी – जुन्या वादाच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष बबन गित्ते, महादेव गित्ते यांच्यासह इतरांनी परळी शहरातील बँक कॉलनी भागात गोळीबार करत बापू आंधळे यांचा खून केला. या प्रकरणी गित्ते यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचे आणि बबन गित्ते यांचे जुने भांडण होते….
-
परळीत गोळीबार, एक ठार!
परळी – परळी शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला आहे. यामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये एकजण ठार आणि दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत हा एका गावचा सरपंच असल्याचे…
-
अवकाळीच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी !
तातडीने पंचनामे करण्याचे कृषिमंत्री मुंडेंचे आदेश ! धारूर – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या…
-
बहिणीच्या स्वागताला भावाची लगबग !
परळी- लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार तथा माजीमंत्री पंकजा मुंडे या आपल्या बहिणीच्या अभूतपूर्व स्वागतासाठी भाऊ धनंजय मुंडे यांची लगबग दिसून आली.एक हजार किलोचा हार,चार राज्यातील स्वागत पथकं आणि जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण,हा नजारा होता परळी शहरात.पंकजा मुंडे या प्रथमच परळीत येत असल्याने धनंजय मुंडे यांच्या वतीने त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. भाजप नेत्या पंकजा…
-
पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत !
शिरूर- लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या,पूढे मी तुमची काळजी घेईल असे म्हणत भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांची घोषणा केली होती, मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातून एकाही उमेदवारांची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….
-
युवराज,जहिरने जिंकली परळीकरांची मने !
परळी – भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराजसिंग आणि जहिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत परळीत नाथ प्रतिष्ठानच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. पुढील वर्षी परळीत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मानस कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. परळीची माती ही रत्नांची खाण आहे या मातीने महाराष्ट्र व देशाला अनेक क्षेत्रात विविध रत्ने दिली आहेत….
-
बोअरवेल मशिनवरील दोन कामगारांचा मृत्यू !
परळी- गावात बोअर घेऊन परत निघालेल्या मशीन मधील लोखंडी पाईप चा स्पर्श विद्युत ताराना झाल्याने शॉक लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील वाघबेट या गावात घडली. वाघबेट येथे बोअर घेण्यासाठी मशीन मागविण्यात आले होते. काम संपल्यानंतर ही मशीन घेऊन चालक आणि कामगार परत निघाले.गावातून जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत भारवाहक ताराना या…
-
तांत्रिक मान्यता,प्रशासकीय मान्यता एकाला अन कार्यरंभ आदेश दुसऱ्याला !
बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा खेळ उघडकीस ! बीड- पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास पन्नास लाखांच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांनी मोठा घोळ घालून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता एका एजन्सीला दिल्यानंतर कार्यरंभ आदेश मात्र दुसऱ्याच एजन्सीला देण्याचा प्रकार समोर आला आहे.बांधकाम विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी चक्क चिरीमिरी साठी एजन्सी बदलल्याचे समोर…