Category: परळी
-
डी एम ऑन फिल्ड!दत्ताचे आशीर्वाद घेत प्रचाराचा शुभारंभ!
परळी – प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ज्या दत्त मंदिरापासून केला जातो त्याच बागझरी येथील दत्ताचे आशीर्वाद घेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. राज्यातील बहुतांश उमेदवार आपल्या उमेदवारीसाठी पक्षांकडे उंबरे झिजवत असताना डीएम मात्र पचाराच्या फिल्डवर उतरले आहेत. मला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या असे आवाहन त्यांनी यावेळी…
-
राजश्री मुंडे बालबाल बचावल्या!
बीड -राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे याच्या पत्नी राजश्री मुंडे याच्या गाडीला पुणे सोलापूर दरम्यान पहाटे अपघात झाला. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या. राजश्री मुंडे या पुण्याला जातं असताना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस ने त्यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. राजश्री मुंडे या देखील किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान त्या घरी पोहचल्या…
-
खाजगी शाळांची कसलीच माहिती शिक्षण विभागाकडे नाही!
मला पहा अन पैसे वहा, फुलारीचा नवा धंदा! बीड – बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे पैसे द्या आणि काहीही करा असाच झाला आहे शिक्षणाधिकारी असलेले फुलारी अक्षम्य असे दुर्लक्ष असल्याने बट्ट्याबोळ झाला आहे शाळांच्या संच मान्यता कुठलीच कागदपत्रे शिक्षण विभागात उपलब्ध नसल्यामुळे सुरू आहे नूतन सीईओ शिक्षण विभागाच्या या गैरप्रकाराला आणि फुलारींवर कारवाई करणार…
-
डॉ मुंडेचे पालकमंत्री मुंडेकडून कौतुक!
परळी -डॉ संतोष मुंडे आणि त्यांच्या टीमचे दिव्यांग बांधवांसाठीचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांच्यामुळे दिव्यांगाला सन्मानाची वागणूक मिळते आहे असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात कर्णबधिर दिव्यांगाना मशीनचे वाटप केले. तब्बल १००० कर्णबधिर नागरिकांना या डिजिटल श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि ३७०० पेक्षा जास्त नवीन नागरिकांनी…
-
धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी -तटकरे!
या महिन्यात लाडक्या बहिणींना तिनं हजार मिळणार -अजित पवार! परळी -समाजातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल विकास करण्यासाठी महायुतीचे हे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी येथे दिली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी परळी येथील…
-
सॅम्पल सर्व्हे तातडीने करा, पंधरा दिवसात अग्रीम विमा द्या -कृषिमंत्री मुंडेंच्या कडक सूचना!
बीड-मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्व्हे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या 8 दिवसात पूर्ण करुन त्यापुढील 15 दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रीम पिक विमा मिळावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी आज बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री मुंडे…
-
परळीतील साडेपाचशे कुटुंबाना डीएम चा मदतीचा हात!
परळी – परळी वैजनाथ शहरात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात 550 पेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य धान्य आदींचे नुकसान झाले होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 550 पेक्षा अधिक कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत रविवारी धनंजय…
-
राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणी अभिषेक बियाणीला अटक!
परळी – परळीसह महाराष्ट्रात शाखांचे जाळे असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट अपहार प्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांचे चिरंजीव अभिषेक बियाणी याला पोलिसांनी पहाटे अटक केली. राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये चंदूलाल बियाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास चारशे कोटी रुपयांचा अपहार केला. ठेवीदारांच्या पैशावर एश करणाऱ्या बियाणी यांच्याविरुद्ध अडीच तिनं महिन्यापूर्वी गुन्हे दाखल झाले, मात्र तेव्हापासून सगळे फरार असल्याचे पोलीस…
-
कृषिमंत्री रमले कृषी प्रदर्शनात!
परळी – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रथमच परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव अंतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर भेट देऊन पाहणी केली.तब्बल चार तास कृषिमंत्री मुंडे यांनी तीनशे पेक्षा अधिक स्टॉल ला भेटी देऊन शेतकरी, उत्पादक यांच्याशी चर्चा केली. कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन…
-
नाथऱ्यात गोळीबार!आरोपी फरार!
परळी -पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथरा या गावी आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नाथरा येथील महादेव मुंडे आणि प्रकाश मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहारातून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होते. शनिवारी दुपारच्या सुमारास प्रकाश मुंडे यांनी गावठी पिस्तूल मधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली…