News & View

ताज्या घडामोडी

Category: क्राईम

  • वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!

    वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!

    मुंबई -बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेली सरपंचांची हत्या असो कि परळीतील व्यापाऱ्याचे अपहरण असो, बीड जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आ पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसापूर्वी केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तसेच…

  • देशमुख हत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे नीलम्बन!

    देशमुख हत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे नीलम्बन!

    बीड -पवनचक्की च्या वादातुन निर्घृण हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात केजचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षक महाजन यांच्या निलम्बनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी संतोष देशमुख यांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली होती. घटनेतील आरोपीना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी…

  • परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!

    परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!

    परळी -केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचांच्या हत्येला बारा तास होतं नाहीत तोच एक खळबळजनक घटना परळीतून समोर आली आहे. शहरातील व्यापारी अमोल विकास डुबे यांचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. अंबाजोगाई -परळी रस्त्यावरील घाटात त्यांच्याकडून चार लाख रोख आणि दहा तोळे सोने घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. परळीचे माजी नगराध्यक्ष व पेट्रोल पंपाचे मालक…

  • सरपंच पतीची हत्या, मसाजोग मध्ये तणाव!

    सरपंच पतीची हत्या, मसाजोग मध्ये तणाव!

    केज -तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको करत आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. या घटनेने मसाजोग मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊनअज्ञात व्यक्तीनी…

  • फरार चंदूलाल बियाणीला अटक!

    फरार चंदूलाल बियाणीला अटक!

    अंबाजोगाई -राजस्थानी मल्टीस्टेट पटसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा अपहार करून मागील वर्षभरापासून फरार असलेल्या चंदूलाल बियाणी याने आज अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पतकरली. बियाणी याने ठेवीदारांच्या तब्बल चारशे कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. वाढीव व्याजदाराचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चंदूलाल बियाणी यांनी आज सोमवारी (दि.02) अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली. ज्ञानराधा मल्टीस्टेट…

  • पाठलाग करत गोळीबार, दोन जखमी!

    पाठलाग करत गोळीबार, दोन जखमी!

    अंबाजोगाई -बीड वरून लातूर कडे जाणाऱ्या स्कोर्पिओ गाडीचा पाठलाग करत फॉरच्यूनर गाडीमधून आलेल्या लोकांनी गोळीबार केल्याची घटना सेलूआंबा नजीक घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. संदीप तांदळे आणि अभय पंडित हे काकडहिरा ता बीड येथील रहिवासी असलेले दोन जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारे कोण लोक होते, या गोळीबारमागील कारण काय आहे, विधानसभा…

  • रामकृष्ण बांगर यांना अटक!

    रामकृष्ण बांगर यांना अटक!

    बीड – महानंद डेअरीचे माजी चेअरमन  सहकार आणि शिक्षण क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या  रामकृष्ण बांगर यांना  वाशिम येथून पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून  अपहार प्रकरणात  फरार होते. पाटोदा तालुक्यातील महात्मा फुले अर्बन बँक, वेगवेगळ्या सहकारी सोसायटी, शाळा  संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रामकृष्ण बांगर, त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर, मुलगा…

  • बीडमध्ये हवाला रॅकेट उध्वस्त!

    बीडमध्ये हवाला रॅकेट उध्वस्त!

    बीड शहर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेले हवाला रॅकेट पोलिस अधीक्षक यांच्या कारवाईने उध्वस्त झाले. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या या रॅकेट कडे शहर पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते हे यावरून समोर आले आहे. बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात हवाला मार्फत कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण केली जाते हे सर्वश्रुत आहे. मात्र शहर असो कि शिवाजीनगर अथवा पेठ…

  • ईडी ची कुटेवर कारवाई, 95कोटी जप्त!

    ईडी ची कुटेवर कारवाई, 95कोटी जप्त!

    ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटींची संपत्ती जप्त बीड,छत्रपती संभाजीनगर,पुणे,मुंबई येथील मालमता जप्त बीड – ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आलीये.जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टिस्टेटने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्याप वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले…

  • बबन शिंदे जेरबंद!

    बबन शिंदे जेरबंद!

    बीड -शेकडो कोटी रुपयांचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट चा अध्यक्ष बबन शिंदे याला वृंदावन येथून जेरबंद केले आहे. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता. बीड सह जिल्ह्यात पाच ठिकाणी शाखांचे जाळे उभारून शिंदे याने तीनशे कोटिपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला….