Category: आष्टी
-

पानसंबळ ने मिळवली बोगस प्रमाणपत्रावर पदोन्नती!
बीड -सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ याने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर पदोन्नती मिळवली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते केशव तांदळे यांनी केला आहे. पानसंबळ याने बांधकाम विभागात कोट्यावधी रुपयांची बोगस कामे केल्याचा आरोप करत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शाखा अभियंता असलेल्या कृष्णा पानसंबळ याने उपाभियंता होण्यासाठी…
-

बीड ओबीसी साठी राखीव!
बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…
-

जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!
बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…
-

आष्टी तालुक्यातील पन्नास गावकरी पुरात अडकले!
प्रशासन इयरलिफ्ट करण्याच्या तयारीत! बीड – तब्बल 24 तासापेक्षा अधिक काळापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला असून आष्टी तालुक्यातील सहा गावांमधील 50 पेक्षा अधिक लोक पुराच्या प्रमाणात अडकल्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. बीड जिल्हातील आष्टी तालुक्यामधील, कडा गावामध्ये 11 लोक, सोभा निमगाव मध्ये 14 लोक,…
-

पावसाचा धुमाकूळ, वडवणी, आष्टी, गेवराई, शिरूर मध्ये ढगफुटी!
बीड: जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा धुमाकूळ; आष्टी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी, 30 गावांचा संपर्क तुटला आहे.गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या 32 गावात पाणी शिरलं आहे, तर वडवणी आणि डोंगर पट्याचा संपर्क तुटला आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले…
-

आ धस यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू!
अहिल्यानगर -भाजपचे आष्टी मतदार संघांचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकी गाडीने दुचाकी गाडीला धडक दिली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीने जाणाऱ्या नितीन शेळके यांचा या अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या वाहनाची मागून धडक ही नितीन शेळके यांच्या दुचाकीला बसली. रात्री साडेदहा ते…
-

सुरेश धस आधुनिक भगिरथ -देवेंद्र फडणवीस!
आष्टी -आष्टीचे आ सुरेश धस हे आधुनिक भगीरथ आहेत असं म्हणत या योजनेसह नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा असेही फडणवीस म्हणाले. आष्टी येथे खुंटेफळ तलावाच्या उपसा जलसिंचन योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी…
-

मी शिवगामी म्हणत पंकजा मुंडेनी सभा गाजवली!
आष्टी -मला या भागातले लोक शिवगामी म्हणतात त्या अर्थाने मी देवेंद्र फडणवीस यांची माता आहे, त्यामुळे त्यांच्याप्रति माझ्या मनात ममत्वभाव आणि आदरभाव आहे. सुरेश अण्णा तुम्ही प्रेम केलं मी पण मनापासुन प्रेम करणारी आहे, मेरा वचन ही मेरा शासन है असं म्हणत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभा गाजवली. आष्टी येथील कार्यक्रमात त्या बोलत…
-

मेरे पास देवेंद्र फडणवीस है -आ सुरेश धस!
आष्टी -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी लाडका आहे, त्यामुळे अनेकजण मला विचारतात तुमच्याकडे काय आहे तेव्हा मी सांगतो मेरे पास देवेंद्र फडणवीस है. तुम्ही पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा अशी मागणी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी केली. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील वाळू, आणि राख माफियाना मकोका लावा अशी मागणी धस यांनी…
-

आष्टीत भीषण हत्याकांड!
आष्टी -आष्टी तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाहिरा या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन भावावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या भावाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांना लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा…


