News & View

ताज्या घडामोडी

images 16 2024 01 02T210720.790

पानसंबळ ने मिळवली बोगस प्रमाणपत्रावर पदोन्नती!

बीड -सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ याने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर पदोन्नती मिळवली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते केशव तांदळे यांनी केला आहे. पानसंबळ याने बांधकाम विभागात कोट्यावधी रुपयांची बोगस कामे केल्याचा आरोप करत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शाखा अभियंता असलेल्या कृष्णा पानसंबळ याने उपाभियंता होण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडले. शासकीय नोकरीत असल्यास पदोन्नती मिळवण्यासाठी किमान चाळीस टक्यापेक्षा अधिक दिव्यांग असल्यास पदोन्नती अथवा इतर लाभ मिळतात. मात्र पानसंबळ याने बोगस प्रमाणपत्र काढून पदोन्नती मिळवली आहे.

बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 आष्टी येथे नोकरीस असताना सध्या त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा देखील पदभार आहे. बोगस दिव्यांग असलेल्या या अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलाच्या नावावर लायसन काढून कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत.

यापूर्वी त्याच्या कार्यालयात दोनवेळा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली, ज्यातील एफ आय आर मध्ये पानसंबळ याचे नाव आहे, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच गुन्हा दाखल करावा अशी मागणी केशव तांदळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *