बीड- राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर बीडमधून एकमेव आ संदिप क्षीरसागर यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पवार यांनी जिल्हाध्यक्ष यांच्यासह संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त केली.बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आ संदिप क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या तीस चाळीस आमदारांसह भाजप सेनेला पाठिंबा देत सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आला.या दरम्यान बीडचे आ संदिप क्षीरसागर वगळता धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे यांनी अजित पवार यांना साथ दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद वाढत गेल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभरातील अनेक जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली.यामध्ये बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
त्यानंतर शरद पवार यांच्या सूचनेनुसार बीडचे आ संदिप क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.माजीमंत्री जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या हस्ते आ क्षीरसागर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
Leave a Reply