News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल द्वादशी / छत्रपती संभाजी महाराज जयंती( तिथीप्रमाणे )- छत्रपती शाहू महाराज जयंती / मोहरम
🌸 नक्षत्र…. विशाखा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २६ जून २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २६ जुन २०२६‼️

मेष:- अनुकूल दिवस आहे. कामामध्ये चांगली प्रगती साधेल, आवडती व्यक्ती भेटेल. नात्यातून लाभ होतील. आज विशेष पराक्रम कराल. सरकारी कामात यश मिळेल. सौख्य लाभेल.

वृषभ:- प्रयत्न करा काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. व्यापारामध्ये प्रगती साधेल. भेटवस्तू मिळतील. संवाद साधतांना योग्य ती काळजी घ्यावी.

मिथुन:- नियोजित कामामध्ये यश मिळाल्याने स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. प्रेमात यश लाभेल. काही मतभेद होण्याची शक्यता आहे.

कर्क:- प्रगतीची नवी दिशा मिळेल. जमीन व्यवहारात लाभ होतील. सकारात्मकता वाढवा योग्य अयोग्य सारासारा विचार वाढवा.

सिंह:- कामामध्ये चांगली प्रगती साधेल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक वजन प्रतिष्ठा वाढेल. आज तुमचे कौतुक होईल. भेटीगाठीतून आनंद मिळेल.

कन्या:- आनंदी दिवस आहे. चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. कलाकारांना संधी मिळतील. वरिष्ठ खुश होतील. नोकरदारांना चांगला दिवस आहे.

तुळ:- चांगले यश मिळेल. अनुकूल ग्रहमान आहे. सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद मिळतील. भाग्योदय होईल.

वृश्चिक:- मन मोठे करा संमिश्र दिवस आहे. कामाचे नियोजन बदलले तरीही अंतिमतः ते तुमच्या फायद्याचे आहे. प्रशासकीय कामे पुढे ढकलली जातील.

धनु:- नविन संधी मिळेल. अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. शत्रू माघार घेतील. व्यावसायिक स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल.

मकर:- कामाचा ताण वाढेल. नविन योजनेतून कामाची व्याप्ती वाढेल, नफा देखील वाढणार आहे. विजयश्री प्राप्त होईल.

कुंभ:- धार्मिक कामात मन लागेल प्रगती साधेल. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. कार्यकुशलतेने सन्मान प्राप्त होईल.

मीन:- नवीन ओळखी होतील. एखादी विशेष पदवी प्राप्त होईल. नवीन व्यवसाय कामासंबंधात निर्णय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *