मुंबई- मी वीस वर्षांपासून राजकारणात आहे मात्र तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही.सध्या राज्यातजे सुरू आहे किंवा अवतीभवती जे सुरू आहे ते पाहून कंटाळा आला आहे.मी दुःखी आहे,अशा पध्दतीने तडजोडी कराव्या लागल्या तर मी राजकारणातून एक्झिट घेईल असा दावा भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केला.
पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काही बातम्या आल्यानंतर संतापलेल्या पंकजा यांनी संबंधित लोकांवर खटला दाखल करणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी भूमिका थेट असणार आहे. स्पष्टपणे सांगते अनेक पक्षांनी माझ्याबद्दल विधान केलं. माझ्या पक्षाला सन्मान वाटत असेल माझी अपेक्षा आहे, जनतेला लपून-छपून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे असे पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सध्या राज्यात कोणची सत्ता, कोणाला मंत्रिपद, हे आमला हवंय ते आम्हाला हवंय असं सुरू आहे. यात लोकांचं काय? तरुणांचं, महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचं काय? सुपरस्टारचा मुलगा असल्याने त्याच्याकडे ड्रग्ज सापडल्याची चर्चा होते. पण एवढ्या सोप्या पद्धतीने देशात ड्रग्ज मिळतं यावर का चर्चा होत नाही? असा सवाल पंकजा मुंडे यांनी यावेळी विचारला.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, एखाद्या पदावर विराजमान माणसाकडे जर काही माहिती असेल तर ती माहिती लपवून ठेऊन त्याचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केली नाही पाहीजे. त्या माहितीचा न्यायाने उपयोग केला पाहीजे.
माझ्या भूमिकेची प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला असल्याने मी प्रचंड कंफ्यूज आहे. मी २० वर्षांमध्ये सुट्टी घेतली नाहीये. मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्यीची गरज आहे असेही पंकजा मुडे म्हणाल्या आहेत.
मला एक-दोन महिन्यांच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मी आमदार झाल्यावर सांगितलं होतं, ज्या विचारधारेला समोर ठेवून मी राजकारणात आले त्यांच्याशी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातील एक्झीट घ्यायला देखील मी मागे पुढे पाहणार नाही असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मी कोणत्याही नेत्याशी पक्ष प्रवेशाबद्दल भेटले नाही. तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी यांना प्रत्यक्ष कधी पाहिले ही नाही. मी नाराज नाही, पण दुःखी आहे असेही जाहीर केले.
Leave a Reply