सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पुष्य शुक़्ल दशमी / पुत्रदा /स्मार्त एकादशी
🌸 नक्षत्र…. भरणी
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. ३० डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ३० डिसेंबर २०२५‼️
मेष
आज
आज मन थोडं चंचल राहील. घर, काम आणि स्वतः यामध्ये ओढाताण होऊ शकते. पण संध्याकाळनंतर मन प्रसन्न होईल. मित्रमैत्रिणीशी बोलल्याने दिलासा मिळेल. प्रेमात बोलताना जरा हळुवार राहा.
वृषभ
आज
आज तुमचं मन खूप भावूक राहील. नात्यांमध्ये जिव्हाळा वाटेल, पण अपेक्षा जास्त ठेवू नका. कला, सजावट, संगीत यामध्ये मन रमेल. खर्च करताना थोडं भान ठेवा.
मिथुन
आज
आज डोक्यात बरेच विचार येतील. काय करावं, काय नको असा गोंधळ जाणवेल. संध्याकाळनंतर मात्र स्पष्टता येईल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, विश्रांती घ्या.
कर्क
आज
नाती आज खूप महत्त्वाची वाटतील. जोडीदार, कुटुंब यांच्याशी संवाद साधताना समजूतदारपणा ठेवा. थोडी भावनिक अस्थिरता जाणवू शकते, पण प्रेमाने सगळं सावराल.
सिंह
आज
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. तुमचं नेतृत्व आणि आत्मविश्वास दिसून येईल. मात्र घराकडे दुर्लक्षित करू नका. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या.
कन्या
आज
आज मन शांततेचा शोध घेईल. जुन्या आठवणी, भावना वर येतील. एखादं सर्जनशील काम, वाचन, लिहिणं यामुळे मनाला आधार मिळेल. अति विचार टाळा.
तुळ
आज
घर, कुटुंब आणि जबाबदाऱ्या यामध्ये दिवस जाईल. घर सजवणं, स्वच्छता, बदल करावासा वाटेल. प्रेमात थोडी स्वप्नाळू भावना राहील, पण वास्तव लक्षात ठेवा.
वृश्चिक
आज
आज शब्द जपून वापरा. मनातलं लगेच बोलण्याऐवजी थोडा विचार करा. संध्याकाळनंतर मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मन मोकळं होईल.
धनु
आज पैशांच्या देवघेव करताना सावध रहा. कुटुंबातील सदस्यांशी जिव्हाळा वाढेल. प्रेमात थोडी असुरक्षितता जाणवेल, पण संवादाने सगळं ठीक होईल.
मकर
आज चंद्र तुमच्याच राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. “मी सगळं करते/करतो अशी भावना येऊ शकते. स्वतःवरही प्रेम करा.
कुंभ
आज सकाळ जरी कंटाळवाणी असली तरी
संध्याकाळनंतर तुमचा मूड बदलू लागेल. नवीन विचार, वेगळी दृष्टी मिळेल. सामाजिक काम, मैत्री, गप्पा यामुळे आनंद मिळेल. स्वतःला मोकळं ठेवा.
मीन
आज
आज मन खूप हळवं राहील. लवकर रडू येऊ शकतं, लवकर भावना दुखावू शकतात. ध्यान, प्रार्थना, संगीत यामुळे मन शांत ठेवा. स्वतःशी प्रेमाने वागा.












Leave a Reply