News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशिभविष्य !

मेष-आरोग्य उत्तम राहिल. मित्रांसोबत खेळण्याचा प्लान आखाल. व्यवसायात नफा झाल्यामुळे चेहऱ्यांवर आनंद पसरेल.प्रिय व्यक्तीकडून आवडती भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक भागीदारी काही सुरू करणे टाळा. नवीन पुस्तकाची खरेदी करून एकांतात पुस्तक वाचनाचा आनंद घेण्याची इच्छा होईल. आवडती व्यक्ती भेटेल.
शुभरंग : काळा

वृषभ
गोशाळेला सव्वाकिलो धान्याचे वाटप करा. कारण कोणतेही असो मन:शांतीवर परिणाम होऊ देऊ नका. शॉपिंग मॉलमध्ये खरेदीची मजा घ्याल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस व्यस्त जाईल. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे लोकं तुमच्याशी बोलायला येतील. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : जांभळा

मिथुन
अनावश्यक कृती केल्यास आजचा दिवस तापदायक जाण्याची शक्यता आहे. घरात गुलाबाचे अत्तर शिंपडा. गणपती मंदिरात जाऊन 21 दुर्वा वाहून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल. सकाळी सूर्याचा 108 वेळा जप करा. मनातील नकारात्मक विचार काढून टाका.
शुभरंग : आकाशी

कर्क
महिलेला पांढऱ्या रंगाचे कपडे दान करा. घराचे सुशोभिकरण करावेसे वाटेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. तिजोरी ताजी मोगऱ्याची फुले ठेवा. परसात गावठी गुलाबाचे झाड लावून त्याची निगा राखा. प्रिय व्यक्ती आज तुमची इच्छा पूर्ण करणार आहे.
शुभरंग : पिवळा

सिंह
श्रीकृष्णाचा 108 वेळा नामजप करा. आरोग्याची काळजी घ्या. आवडती कला जोपासण्यात वेळ घालवाल. मित्रमंडळी अनपेक्षितपणे घरी येण्याची शक्यता आहे. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. प्रियकर किंवा प्रेयसीकडून आज आश्चर्याचा सुखद धक्का मिळण्याची शक्यता आहे. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडू शकतात.
शुभरंग : निळा

कन्या
मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराल. व्यसन टाळा. आहारात फळे, पालेभाज्यांचा समावेश करा. घरातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्याल. दिनक्रम व्यस्त असेल. सकाळी 15 मिनिटे सूर्यनमस्कार, ध्यानधारणा यासाठी काढा. घरात तीन मोरपिसे ठेवा. दररोज आराध्य देवतेची आरती करा. लोकं तुमचे म्हणणे विचारात घेतील. लाल रंगाचा पोषाख परिधान कराल.
शुभरंग : पांढरा

तूळ
लाल रंगाचे बूट घाला. कार्यालयातून लवकर घऱी जाण्याचा प्रयत्न कराल. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करण्याचा प्रयत्न कराल. आवडती व्यक्ती तुम्हाला भेटण्याकरिता घरी येण्याची शक्यता आहे. कामाचे ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. घरगुती कामं कंटाळवाणी होतील. व्यवसायात नफा मिळेल. प्रिय मैत्रीण अचानक बऱ्याच वर्षांनी भेटण्याची शक्यता आहे.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक
केळीच्या झाडाची पूजा करा. बाहेरील कामाकाजामुळे दमून जाण्याची शक्यता आहे. घरातील लहान लहाग गोष्टी विकत घेण्यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आवडीने पार पाडाल. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका. जोडीदारासोबत असलेल्या एखाद्या गोड आठवणींमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल.
शुभरंग : मोरपिसी

धनु
चांदीच्या ताटात जेवा. स्वत:वर विश्वास ठेवा. नवीन प्रकल्प राबवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ मिळेल. धार्मिक कार्यासाठी देणगी द्या. आवडती भेटवस्तू अनपेक्षितपणे मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. सौंदर्याची काळजी घ्या. तुळशीला पाणी घालून पूजा करा. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : खाकी

मकर
आंघोळीच्या पाण्यात कापूर घाला. परोपकार करा. रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा. घरातील वातावरण उत्साही असेल. कामाचे श्रेय दुसरी व्यक्ती घेण्याची शक्यता आहे. नारिंगी रंगाचा पोषाख परिधान करा. घरात सायंकाळी धूप दाखवा. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून यथासांग आराध्य देवतेची पूजा करा. आहारात कोशिंबीरीचा समावेश करा. पोटाची काळजी घ्यावी लागेल.
शुभरंग : राखाडी

कुंभ
कामाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असले तरीही आरोग्य चांगले राहिल. जोडीदारासोबत चित्रपट पाहायला जाल. नात्यातल्या सगळ्या तक्रारी निघून जातील. नोकरीत पदोन्नती होईल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग होईल. वाण सामानाची खरेदी कराल. डाव्या हातावर अंगठ्याच्या शेवटी तळहातावर ’24’ हा आकडा लिहाल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
शुभरंग : हिरवा

मीन
लाल कपडात मसूराची डाळ बांधून ही पोटली जवळ ठेवा. तुमच्या कामाला कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. कोणाच्याही दडपणाखाली निर्णय घेऊ नका. परगावी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. नवीन नाती जोडाल. सायंकाळी जोडीदारासोबत खास प्लॅन आखाल.
शुभरंग : पोपटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *