बीड- पदोन्नती झाल्यानंतर कोणताही अधिकारी, कर्मचारी खुश होऊन त्या पदावर तातडीने रुजू होतो,मात्र बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वडवणीला नियुक्ती असताना बीड कार्यालयात कारभार पाहणारे व्ही डी आनेराव या कर्मचाऱ्याला खुर्चीचा मोह सुटत नाहीये.शिक्षण विभागात पदोन्नती झाल्यानंतर देखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर स्वतःची ऑर्डर याने काढून घेतली आहे.कारण ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जेवढा माल आहे तेवढा सीईओ च्या खुर्चीत सुद्धा नाहीये हे आनेराव यांना चांगलंच माहीत आहे,त्यामुळे हे महाशय रोज पाच पंचवीस हजार छापण्यासाठी पदोन्नतीच्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत.
बीड जिल्हा परिषद मध्ये सीईओ अजित पवार,अतिरिक्त सीईओ वासुदेव सोळंके आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे या त्रिकुटाने अक्षरशः नंगानाच सुरू केला आहे.झेडपीआर चे वितरण असो की जल जीवन मिशन च्या कामांचे वाटप किंवा एक दिवस रिटायरमेंट ला राहिलेल्या मुख्याध्यापक लोकांना पदोन्नती देण्याचा विषय असो.या तिघांना भेटलं अन त्यांचं समाधान केलं की हे कोणाच्याही पदरात कसलेही माप टाकायला तयार होतात.
महाराष्ट्रात एकमेव जिल्हा परिषद बीड असेल की जिथे शंभर पेक्षा अधिक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत.सीईओ अजित पवार यांना खुश केले की ते कशावरही सह्या करतात हे सर्वांना माहीत झाले आहे.
मूळ वडवणी येथे नियुक्ती असलेला व्ही डी आनेराव नावाचा कर्मचारी अनेक वर्षांपासून बीडच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काम करत आहे.वर्क ऑर्डर काढण्यासारखे महत्वाचे अन दाम वाले काम त्याच्याकडे आहे.एका वर्क ऑर्डर साठी हा आनेराव किमान दहा ते वीस घेतो अशी चर्चा आहे.
या आनेराव ची मागील महिन्यात शिक्षण विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती झाली.हे महाशय तेथे रुजू देखील झाले अन लगोलग सीईओ यांच्या पायाशी लोळण घेतली.बर आनेराव म्हणजे सीईओ यांच्या कामाचा माणूस.काहीही कमी जास्त असल की हे असले कर्मचारी साहेबांच्या चड्या धुवायला कमी करत नाहीत.कारण त्यात सुद्धा हे पैसे काढतात.
साहेबांशी बोलून त्यांचं त्यांचं फिक्स झालं की आनेराव यांची पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली.जे की बेकायदेशीर आहे.
एकीकडे कर्मचारी कमी असल्याने ककम वेळेवर पूर्ण होत नाही म्हणून सांगणारे शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी आनेराव यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यास परवानगी कशी दिली हा देखील एक प्रश्नच आहे.जे मिळेल ते पदरात पाडून घ्या,कोणाला विरोध करू नका,रिटायरमेंट सेफ करा अस धोरण त्यांनी स्वीकारले असल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराचे वाटोळे झाले आहे.
Leave a Reply