शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे दाम करी काम धोरण शासनाला चुना लावणारे !!
बीड- नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बीडचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी भलतेच मेहरबान झाल्याचे दिसत आहे.31 मे ला रिटायर होणाऱ्या काही मुख्याध्यापक आणि शिक्षकांना 30 मे रोजी पदोन्नती देण्यासाठी कुलकर्णी आणि टीम कामाला लागली आहे.यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली असून एक दिवसानंतर रिटायर होणाऱ्यांना सुट्टीच्या काळात पदोन्नती देऊन शासनाच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा भार टाकला जाणार आहे.
बीड जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे आंधळं दळतय अन कुत्रं पीठ खातंय असा झाला आहे.प्रशासक राज असल्याने अधिकारी मनमानी करत आहेत.विशेषतः शिक्षण विभागात पैशाच्या जीवावर काम करून घेणारी अधिकारी कर्मचाऱ्यांची टोळी कार्यरत आहे.त्यामुळे बेकायदेशीर कामे करून घेण्याचा सपाटा सुरू आहे.
बीड जिल्हा परिषदेतील श्रेणी तीन मधील शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी फाईल मूव्ह झाली आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्युज ला दिली आहे.यामध्ये तीन ते चार शिक्षक किंवा मुख्याध्यापक हे 31 मी रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.एक दिवसानंतर जर हे लोक रिटायर होणार असतील तर त्यांना पदोन्नती देणे कायदेशीर आहे का? दुसरी गोष्ट सध्या सुट्या आहेत अशावेळी हे लोक रुजू कुठं होणार ? कारभार कुठला पाहणार? हे साधे प्रश्न सुद्धा कुळकर्णी अँड कंपनीला कसकाय पडले नाहीत अशी चर्चा सुरू आहे.
प्रभावती कदम ,जयंत तांदळे,पठाण फेरोज,भारत गायकवाड,शेख साबेरा अशी अनेक नवे आहेत ज्यांचा जन्म 1965 ला झाला आहे.त्यांना 31 मी रोजी 58 वर्ष पूर्ण होतात.मग तरीही या लोकांना पदोन्नती का दिली जात आहे हे न उलगडणारे कोडे आहे. एक दिवसानंतर रिटायर होणाऱ्यांना पदोन्नती चा लाभ मिळाला तर लाखो रुपयांचा भुर्दंड शासनाला सोसावा लागणार आहे.मात्र स्वतःचे खिसे गरम होत असतील तर शासनाला किती का चुना लागेना अशी मानसिकता असलेले अधिकारी बीडला असल्याने जिल्ह्याची वाट लागली आहे.
Leave a Reply