News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशिभविष्य !

मेष- प्रणयी जीवनात आज मौजमजा करण्याची अपेक्षा ठेवा. आज आपल्या जोडीदारास कौतुक करवून घ्यावेसे वाटेल व आपण सुद्धा कौतुक करण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसते. आपल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता असल्याचे गणेशास वाटते. मात्र, आपल्या जोडीदाराशी आपण वचनबद्ध होण्याची गरज आहे. सध्याच्या काळात व्यवसायातल्या उत्पादनाबरोबरच मार्केटिंगकडेही लक्ष द्यायला पाहिजे.
उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.

वृषभ (Taurus) : व्यवसायात नवी उंची गाठाल. त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे विरोधकांचे प्लॅन्स उधळले जातील. व्यवहारात पारदर्शकता ठेवणं महत्त्वाचं आहे.
उपाय : गणपतीला दूर्वा वाहा.

मिथुन (Gemini) : व्यवसायात अनेक आव्हानं असतील. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत गरजेची आहे. गांभीर्यानं काम केल्यास समस्या सोडवू शकता.
उपाय : मारुतीला नारळ अर्पण करा.

कर्क (Cancer) : व्यावसायिक कामात अडचणी राहतील. ठरलेल्या नियोजनानुसार काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कर्मचाऱ्यांच्या गप्प राहण्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
उपाय : दुर्गादेवीला लाल ओढणी अर्पण करा.

सिंह (Leo) : व्यवसायाच्या विस्ताराबाबत गांभीर्यानं काम करा. सध्या ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. मार्केटिंग आणि जनसंपर्काची व्याप्ती वाढवली पाहिजे. ऑफिसची कामं घरी करावी लागू शकतात.
उपाय : छोट्या मुलींना खीर खाऊ घाला.

कन्या (Virgo) : व्यवसायात खूप जास्त गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे. विस्तारीकरणाचा पुन्हा एकदा विचार करावा. कोणताही लहान-मोठा निर्णय घेताना एखाद्याचं मार्गदर्शन किंवा सल्ला घेणं गरजेचं आहे.
उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.

तूळ (Libra) : व्यवसायाशी निगडित कोणतंही काम फायदेशीर ठरेल. त्यातून चांगले परिणाम दिसतील. मालमत्तेसंदर्भातल्या व्यवसायात मोठा व्यवहार होईल. निष्काळजीपणा आणि उदारता व्यवसायासाठी हानिकारक ठरू शकते. सध्या लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.
उपाय : लक्ष्मीमातेला कमळ अर्पण करा.

वृश्चिक (Scorpio) : जुनी येणी आज वसूल होऊ शकतात. कामाच्या बाबतीत तुमच्या क्षमता दाखवून देण्याची संधी मिळू शकते. लोकांशी असलेले संबंध दृढ होतील. ऑफिसमध्ये काम करताना एखादी चूक होण्याची शक्यता आहे.
उपाय : तेलात तळलेली इम्रती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

धनू (Sagittarius) : व्यवसाय विस्ताराला चांगला प्रतिसाद मिळण्याची ही योग्य वेळ आहे. सरकारी कामकाजाबाबतच्या कोणत्याही कागदपत्रांवर न वाचता सही करू नका. कामानिमित्ताने एखाद्या प्रवासाची सूचना मिळू शकते.
उपाय : दिव्यांग व्यक्तीला मदत करा.

मकर (Capricorn) : प्लॅन्सबाबत काम करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. नवीन काम सुरू होईल. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांशी सुसंवाद ठेवावा. पदोन्नती मिळू शकते.
उपाय : पीठ व साखर एकत्र करून मुंग्यांसाठी ठेवा.

कुंभ (Aquarius) : भागीदारीच्या व्यवसायात सलोखा ठेवा. नाही तर व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा संपर्क वाढवा.
उपाय : माशांना खाऊ घाला.

मीन (Pisces) : व्यवसायातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबतच्या योजनांची माहिती उपलब्ध होईल. नवीन यंत्र किंवा तंत्रज्ञान वापरण्यात यशस्वी व्हाल. या वेळी नवी अचीव्हमेंट साध्य करू शकाल.
उपाय : सूर्यदेवाची आराधना करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *