मुंबई- बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शिवसंग्राम च्या प्रमुख ज्योती मेटे यांना देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसंग्राम च्या प्रमुख ज्योती मेटे यांनी देखील शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती.मात्र त्यांच्याऐवजी सोनवणे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाले.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
त्यानंतर मेटे यांना वंचितकडून ऑफर देण्यात आली होती,परंतु त्यांनी नकार दिला,त्यामुळे हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हिंगे यांच्या उमेदवारीमुळे बीड मतदारसंघात आता तिरंगी फाईट होणार आहे.
Leave a Reply