बीड- बलात्काराचा दाखल असलेला गुन्हा दडवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळणाऱ्या आदित्य अनुप धन्वे यास दहा वर्षाची शिक्षा ठोठावल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे.मात्र त्याला चारित्र्य प्रमाणपत्र देणारे पोलीस अधिकारी, रुजू करून घेणारे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ओळख दाखवून साक्षांकन देणारे समाज कल्याण अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बलात्कार प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा झालेल्या आरोपी आदित्य अनुप धन्वे हा जिल्हा परिषदेच्या सेवेत नोकरीस असल्याची बातमी न्यूज अँड व्युज ने केल्यानंतर एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी तातडीने याबाबत माहिती घेत धन्वे यास निलंबित केले.
मात्र तो नोकरीत रुजू होताना त्याने जे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले ते निल दिले.ही बाब उघडकीस आल्यानंतर त्याला प्रमाणपत्र कोणी दिले याचा शोध घेण्यात आला ,त्याच्या निलंबन आदेशात पाठक यांनी उल्लेख केल्याप्रमाणे जिल्हा विशेष शाखेने 19/ 9/ 2019 रोजी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.म्हणजेच जिल्हा विशेष शाखा आणि इतर सर्वच पोलीस ठाण्यामधून त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती दडवण्यात आली किंवा दुर्लक्ष करण्यात आले.
तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी त्याला ओळखत असल्याचे पत्र दिले आहे,त्यांनी देखील कोणतीही खातरजमा न करता हे प्रमाणपत्र दिले असल्याचे दिसून येते.
धन्वे यास तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी रुजू करून घेताना तो जेलमध्ये आहे की होता,किंवा त्याच्यावर काही गुन्हा होता की नाही याची माहिती न घेता तो जेलमध्ये असताना म्हणजेच 20 मार्च 2019 ला रुजू करून घेतले.
- शिंदे यांचा मोठा निर्णय!
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
- आजचे राशीभविष्य!
- एकनाथ शिंदे यांचा राजीनामा!
- आजचे राशीभविष्य!
या सगळ्या प्रकरणात सीईओ पाठक यांनी त्यास निलंबित केले आहे परंतु त्याला चारित्र्य प्रमाणपत्र देणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, रुजू करून घेणारे तत्कालीन सीईओ,डेप्युटी सीईओ,डीएचओ यांची चौकशी होऊन कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply