बीड- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश नक्की झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी माझा कुठलाही राजकीय निर्णय नाही मी स्वार्थासाठी कधीच कुठले निर्णय घेतलेले नाहीत जो निर्णय घ्यायचा तो जनतेला आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल असे म्हटले आहे.एकप्रकारे त्यांनी डॉ योगेश यांच्या निर्णयाबद्दल नाराजीच व्यक्त करत आपला विचार स्वतंत्र नसल्याचे म्हटले आहे.त्यामुळे क्षीरसागर घराण्यातील संघर्ष पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता स्वतंत्र पध्दतीने राजकारण करत असलेले माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ योगेश क्षीरसागर हे येत्या दोन चार दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश घेणार आहेत.
याबाबत माध्यमांमधून बातम्या आल्यानंतर तातडीने जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.ज्यामध्ये त्यांनी राजकीय स्वार्थासाठी आपण कधीच कोणता निर्णय घेतला नाही अस म्हणत एकप्रकारे डॉ योगेश यांना टोला हाणला आहे.पुतण्याच्या निर्णयाचा आणि आपला संबंध नसल्याचे त्यांनी यावरून स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले आहेत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर वाचा त्यांच्याच शब्दात…………! गेल्या 50 वर्षात बीड जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जीवलग कार्यकर्त्यांनी माझ्या राजकिय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ
दिलेले आहे.अशा जीवाभावाच्या लोकांना विश्वासात घेतलेल्याशिवाय मी कोणताही राजकिय निर्णय घेणार नाही.विकासासाठी व जनहितासाठी सतत पाठपुरावा आणि संघर्ष चालु राहील सध्या सुरु असणाऱ्या चर्चेत किंवा राजकिय निर्णयात माझा कसलाही सहभाग नाही, भविष्यात योग्य वेळी सर्वांना
विश्वासात घेऊन योग्य राजकिय निर्णय घेतला जाईल.माझ्या राजकिय
स्वार्थासाठी मी कुठलेही निर्णय कधीही घेतलेले नाही, जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय असेल अशी प्रतिक्रिया माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.
Leave a Reply