बीड- जळगाव येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असताना कोरोना काळात साहित्य खरेदी प्रकरणी निलंबित झालेल्या डॉ नागेश चव्हाण यांच्याकडे बीडच्या शल्य चिकित्सक पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या अधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे.
बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्यावर नोकर भरती प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांचा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
डॉ साबळे यांच्यावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू आहे, त्यांचा पदभार ज्या डॉ चव्हाण यांच्याकडे दिला आहे त्यांची देखील विभागीय चौकशी सुरू आहे.डॉ चव्हाण यांच्यासोबत डॉ बाबूलाल बारेला,डॉ सुनील बन्सी,डॉ संदिप पाटील यांच्यावर 2022 मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
एकीकडे ज्या सीएस साबळे यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.तर दुसरीकडे कोरोना काळात निलंबित झालेले आणि विभागीय चौकशी सुरू असलेल्या डॉ चव्हाण यांच्याकडे पदभार देऊन नेमकं शासनाने काय साध्य केलं आहे अशी चर्चा सुरू आहे.
Leave a Reply