बीड- लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात करण्यात आलेल्या भरती प्रकरणात जोशी ठरलेले बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी प्राप्त झाले आहेत निलंबन काळात डॉक्टर साबळे यांचे मुख्यालय नांदेड असणार आहे औषध निर्माण अधिकारी तानाजी ठाकर आणि रियाज शेख यांच्या कारभाराचा बळी डॉक्टर साबळे ठरले असल्याची चर्चा आहे आता ठाकर आणि रियाज यांच्यावर निलंगानाची कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या याबाबत विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली होती ही घोषणा झाल्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि जिल्हा रुग्णालयासमोर नागरिकांनी निलंबन रद्द करावे म्हणून आंदोलन देखील केले होते दरम्यान सोमवारी डॉक्टर साबळे यांच्या निलंबनाचे आदेश बीड येथे प्राप्त झाले असून त्यामध्ये डॉक्टर साबळे यांचे निलंबन काळातील मुख्यालय नांदेड जिल्हा रुग्णालय असेल असे म्हटले आहे
गेल्या दीड दोन वर्षात डॉक्टर साबळे यांनी रुग्णसेवेला प्राधान्य देत जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र अतिशय भ्रष्ट आणि स्वतःच्याच नातेवाईकाच्या नावावर एजन्सी दाखवून करोडो रुपयांचा अपहार करून बोगस बिले उचलणाऱ्या तानाजी ठाकर आणि रियाज शेख या दोन औषध निर्माण अधिकारी यांना साबळे यांनी वेळोवेळी पाठीशी घातले होते ऑक्सिजन प्लांट असो की इतर कुठलीही खरेदी ठाकर रियाज एजाज आणि आदिनाथ मुंडे यांनी साबळे यांना सोबत घेत करोडो रुपये छापले असा आरोप झाला होता आता साबळे यांच्या निलंबनानंतर यांचे निलंबन लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
Leave a Reply