News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल द्बादशी/ भागवत एकादशी / तुळशी विवाह प्रारंभ / चातुर्मास समाप्ती
🌸 नक्षत्र…. रेवती
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. २१ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४० मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु ‼️

‼️दैनिक राशी भविष्य ‼️

‼️दिनांक २१ नोव्हेंबर २०२६‼️

मेष:- आज आपल्या कामात आनंद मिळेल. अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नियोजित हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आर्थिक कामात यश मिळेल.

वृषभ:- मानाची प्रसन्नता राहील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. आत्मविश्वास कायम ठेवा.

मिथुन:- आनंदी दिवस आहे. मन उत्साही राहील. नियोजन यशस्वी करण्यासाठी वेळ द्यावा लागु शकतो. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. अडथळे दूर होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

कर्क:- नविन जबाबदारी वाढेल. आज अधिक काम करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. ज्येष्ठांना मान द्यावा.

सिंह:- नियोजित कामानिमित्त प्रवास घडू शकतो. प्रवास कार्यसाधक होतील. मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थयात्रेचा योग येईल. आर्थिक लाभ होतील.

कन्या:- केल्याने होत आहे रे ! मेहनतीने अपेक्षित यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. कौटुंबिक मतभेद कमी करण्यात यश मिळेल. संयमाने घ्या.

तुळ:- चांगला दिवस आहे. मनाप्रमाणे बरेच दिवस वाट पाहत असलेली संधी चालून येईल. आपल्या काममध्ये जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे करार होऊ शकतात. तरी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

वृश्चिक:- चांगला दिवस आहे. नियोजित कामातून आर्थिक लाभ होतील. इच्छुकांना नवीन संधी मिळतील. मेहनत वाढवावी लागेल. वाणीवर संयम ठेवावा. भेटीगाठीतून कार्याची व्याप्ति वाढेल.

धनु:- कौशल्यपूर्ण कामामध्ये यश लाभेल. नवीन ज्ञान प्राप्त होईल. मित्र नातेवाईकांची भेट होईल, त्यातून आनंदी राहाल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल.

मकर:- सामाजिक राजकीय क्षेत्रात नाव होईल नियोजित कामामध्ये यश लाभेल. शेती किंवा स्थावर मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. नवीन ओळखी होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. प्राणायाम योग करून प्रसन्नता वाटेल.

कुंभ:- पूर्व संकल्पित कामांना गती लाभेल. लाभदायक दिवस आहे. पराक्रम गाजवाल. नातेसंबंध सुधरतील त्यातून लाभ मिळतील. योग्य नियोजन करा यश लाभेल.

मीन:- आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये मन रमेल. धनप्राप्ती होईल. ध्यान आध्यात्मिक उपासना घडेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्र सहकारी यांच्याकडून अपेक्षित मदत लाभेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *