News & View

ताज्या घडामोडी

उदय साखर कारखाना सोनवडे बांबवडे 3

शिक्षण विभागात लाचखोर पकडले!

केज – चौकशी अहवाल मध्ये आपल्यासारखी सकारात्मक माहिती द्यावी यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या केकच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील दोघा जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने बुधवारी जेरबंद केले.

दत्तात्रय मुरलीधर चाटे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज (वय 56) आणि जयगुरु शिवाजी गिरी (जिल्हा परिषद शिक्षक तांदळे वस्ती) अशी कारवाई करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या विरुद्ध सुरु असलेल्या चौकशीचा अहवाल पॉझिटिव्ह देऊन सहकार्य करावे यासाठी चाटे आणि गिरी या दोघांनी लाच मागितली होती. विशेष बाब म्हणजे या चाटे नावाच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याविरुद्ध सुद्धा अनेक तक्रारी आहेत. मात्र हे महाशय दुसऱ्याचा अहवाल देण्यासाठी लाच घेताना अटक झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *