News & View

ताज्या घडामोडी

image editor output image 1403354088 1791966200103

लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ गायकवाड निलंबित!

लातूर –आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. लातूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ रेखा मुदखेडकर / गायकवाड यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा पदभार बीडचे जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ सतीशकुमार साळुंके यांच्याकडे देण्यात आला आहे.

image editor output image 1403354088 1791966200103

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) झालेल्या त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यांच्या नियुक्ती बाबतची ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या निर्णयामुळे लातूरच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, डॉ रेखा गायकवाड यांच्या कार्यकाळात विविध पदांसाठी राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवरही यापूर्वी प्रश्न उपस्थित झाले होते. 

रेखा गायकवाड यांच्या कार्यकाळातल्या विविध नियुक्त्या, बदल्या, पदोन्नती प्रक्रिया,रुग्णालयासाठी दिलेल्या मंजुऱ्या आणि औषध खरेदीतील तफावत यासंदर्भात चौकशी करण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या निलंबनाचे अध्यक्ष काढले आहे. या घडामोडीनंतर लातूर आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ साळुंखे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

जवळपास वर्षभरापूर्वी लातूरच्या आरोग्यसेवा उपसंचालक पदावर रुजू झालेल्या डॉ. रेखा गायकवाड यांच्या कार्यकाळात 25 ऑगस्ट 2025 पासून ज्या कामकाजाची चौकशी करण्याचा आदेश सप्टेंबर 2026 मध्ये देण्यात आले होते. नियुक्त्या, बदल्या, पदोन्नती, वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी, औषधे उपकरणांची खरेदी आणि आर्थिक व्यवहार अशा बाबींची तपासणी करण्याचे हे आदेश होते. या चौकशीसाठी आधी नऊ सदस्यांचे समिती नेमण्यात आली होती. मात्र उद्या 24 तासात ती बदलून सहा सदस्यांची नवी समिती नियुक्त करण्यात आली. समितीच्या रचनेवरून तसेच चौकशीच्या व्याप्तीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या संपूर्ण प्रकरणामागे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दरम्यान, या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ रेखा गायकवाड यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *