बीड -शहरातील नामांकित चंपावती शाळेत थेट उत्तराखंड येथील विद्यार्थी दाखवून पटसंख्या मॅनेज करण्याचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी जेव्हा पंचायत समिती कार्यालयात बैठक घेत होते तेव्हा भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली भलतेच उद्योग करणाऱ्या आणि चंपावती शाळेच्या पॅनलवर काही महिन्यांपूर्वी नियुक्ती मिळवलेल्या लोकांनी या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती या प्रकरणात पाळीमुळे खोदून काढण्याऐवजी यंत्रणा मॅनेज होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
चंपावती शाळेमध्ये बोगस शालार्थ आयडी प्रकरण असो कि बेकायदेशीर पद्धतीने दिली गेलेली पदोन्नती ची प्रकारणे असोत या ना त्या कारणावरून शाळा नेहमीच वादात सापडलेली आहे.
अशातच पट पडताळणी ची मुदत संपन्या अगोदर या शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी उत्तराखंड येथील तीन विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केली. हे प्रकरण न्यूज अँड व्यूज ने उघडकीस आणले. त्यानंतर शिक्षण संचालक यांच्या आदेशावरून शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली.
त्यानंतर या शाळेत तीन नव्हे तरी तब्बल 22 विद्यार्थी हे उत्तराखंड येथून खरेदी केले असल्याचे उघडकीस आले. तसेच तब्बल 295 विद्यार्थी कमी असल्याचे समोर आले.
त्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक जोशी यांच्यासह व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याबाबत शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, गट शिक्षणाधिकारी प्रणिता गंगाखेडकर या कार्यालयात बैठक घेत होत्या. त्यावेळी तेथे चंपावती शाळेचे प्रकरण मॅनेज करण्यासाठी काही लोक आले. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांशी बोलणी केली. या मुळे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पोलिसात तक्रार देण्यासाठी उशीर केला तसेच नीलम्बनाची ऑर्डर पत्रकारांना देण्यासाठी नकार दिला.
सायंकाळी उशिरा श्रीमती गंगाखेडकर या शिवाजीनगर पोलिसात तक्रार घेऊन गेल्या. मात्र दिलेली तक्रार सुस्पष्ट नसल्याने पोलिसांनी हे प्रकरण चौकशी नंतर दाखल केले जाईल असे सांगितले.
चंपावती प्रकरणात भारतीय शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या लोकांनी लुडबुड करत मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न चार दिवसापासून सुरु केला आहे. या महाशयानी दोन दिवसापूर्वी बीडमध्ये झालेल्या एका ब्रम्हहत्या प्रकरणात देखील मॅनेजमेंट केल्याची चर्चा आहे. आता शिक्षण अधिकारी चव्हाण आणि गंगाखेडकर या दबावला बळी पडणार कि कायद्यानुसार कारवाई करणारं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Leave a Reply