बीड –बीड जिल्हा परिषदेचे माजी उपशिक्षणाधिकारी तथा माजी शिक्षणाधिकारी ज्ञानोबा सोनवणे यांची दोन मुलं डॉक्टर आहेत, त्यातील एक डेंटिस्ट अन दुसरा आयुर्वेदिक, मात्र त्यांच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च करूनही ते दवाखान्यात नं बसता संस्थेच्या शाळेवर अन कॉलेजवर नोकरी करतात, पण ती सुद्धा कागदोपत्री. कारण हे दोन्ही चिरंजीव ना ज्यावेळी दवाखान्यात असतात त्याचवेळी ते शाळेत अन कॉलेज मध्ये देखील हजर असल्याचे भासवले जाते.हा सगळा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असताना देखील बीडचा शिक्षण विभाग डोळ्यावर पैशाची पट्टी बांधून उभा आहे हे विशेष.
आदर्श महाराष्ट्र बहुउद्देशीय संस्था या गोंडस नावाखाली माजी शिक्षणाधिकारी ज्ञानोबा सोनवणे यांनी आपल्या कार्यकाळात संस्था सुरु केली. या संस्थेचे मादलमोही आणि सावरगाव येथे दोन युनिट आहेत. या दोन ठिकाणी मिळून जवळपास तीस पस्तीस लोकांचा स्टाफ आहे मात्र यातील आठ दहा लोक हे सोनवणे यांची मुलं, सुना, सु्नांच्या बहिणी, भाचे, नातेवाईक आहेत.
विशेष बाब म्हणजे या ज्ञानोबा सोनवने यांना तीन मुलं आहेत यातील राजेश हा संस्थेचा अध्यक्ष तर सतिश आणि भक्तराज हे दोघे डॉक्टर आहेत. यातील एकाचा नगर रोड भागात डेंटल चा दवाखाना आहे. दुसरा मुलगा आयुर्वेदिक डॉक्टर आहे. परंतु हे दोघेही एकाच वेळी आपल्या क्लिनिक मध्ये आणि शाळा कॉलेज मध्ये देखील हजर असतात.
डॉ सतिश सोनवणे हे संस्थेचे कोषध्यक्ष असून कनिष्ठ प्राध्यापक म्हणून देखील पगार उचलतात. तर डॉ भक्तराज हे संस्थेचे सदस्य असून क्लार्क म्हणून नोकरीस आहेत आणि शासनाचा पगार उचलतात.
हा सगळा प्रकार विद्यमान शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्यासहित यापूर्वीच्या सर्वच शिक्षणाधिकारी यांना माहित आहे. परंतु सगळेच लक्ष्मी दर्शनामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. या प्रकरणात आता एस आय टी ने स्वतःच दखल घेणे आवश्यक आहे.




Leave a Reply