News & View

ताज्या घडामोडी

pudhari import wp content uploads 2022 07 6 5 1

आवक जावक खाडाखोड प्रकरणी चौकशी समिती गठीत!

बीडबीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात आवक जावक रजिस्टर मध्ये झालेल्या खाडाखोड प्रकरणात शिक्षण उपसंचालक यांनी त्रिस्तरीय समितीचे गठण केले आहे. हिंगोलीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. हे प्रकरण न्यूज अँड व्यूज ने उघडकीस आणले होते.

नागपूर, अमरावती, जळगाव, नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणात मोठमोठ्या अधिकारी, कर्मचारी, संस्था चालक यांच्या अटकेनंतर राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात आली.

या समितीने राज्यभर चौकशी सुरु केली आहे. यात बीड जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात 2006 ते 2025 या काळात मोठ्या प्रमाणात बोगस आवक जावक क्रमांक टाकून ऑर्डर काढल्याचे प्रकरण न्यूज अँड व्यूज ने उघडकीस आणले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर चे शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ यांनी आवक जावक रजिस्टर खडाखोड प्रकरणात चौकशी समितीचे गठण केले आहे.

आवक जावक रजिस्टर खाडाखोड प्रकरणात चौकशीसाठी जी समिती दाखल होणार आहे त्या समितीने बीड जिल्ह्यातील खाजगी शाळांमध्ये 2006 ते 2024 या काळात कार्यरत असणारे मुख्याध्यापक यांची देखील चौकशी करणे गरजेचे आहे कारण संस्थाचालक मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच शिक्षण अधिकारी यांच्या संगनमताने हा सगळा घोटाळा झालेला आहे.

या समितीमध्ये हिंगोलीच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोलीच्या उपशिक्षणाधिकारी आसावरी काळे आणि अंबाजोगाई चे अधिव्याख्यात श्रीकृष्ण देशमुख यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *