सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण नवमी
🌸 नक्षत्र…. कृतिका
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. ०७ ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/५५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक ०७ आँगस्ट २०२६‼️
मेष: योगायोगाने अचानक काही संधी येतील त्याचा उपयोग करा. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. अपेक्षित सहकार्य मिळाल्याने आनंदी राहाल.
वृषभ: उत्साह व आत्मविश्वासपूर्वक कामामध्ये प्रगती साधाल. हितचिंतकांचे सहकार्य लाभल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सुख मिळेल. नवीन योजना यशस्वी ठरतील.
मिथुन: चांगला दिवस आहे मन प्रसन्नतेसाठी ध्यान योग करा. संवादकौशल्यामुळे कामातील अडचणी दूर होतील. व्यवसायात प्रगती साधेल. प्रवास कार्यसाधक होतील.
कर्क: आनंदी दिवस आहे. अपेक्षित वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपसामध्ये सुसंवाद राहील त्यामुळे नियोजित कामात आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल.
सिंह: विचारपूर्वक व वरिष्ठांच्या सल्ल्याने नियोजनबद्ध कामात यश मिळेल. प्रगती साधेल प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. ध्यान उपासना करावी.
कन्या: घाई करू नका
विचारपूर्वक निर्णय घ्या. यश मिळणार आहै. घरगुती कामे मार्गी लागतील. सुसंवाद व सकारात्मकता महत्वाची असेल. अनावश्यक खर्च टाळावा.
तुळ: मित्र सहकारी अपेक्षित मदत करतील.
मित्रांच्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.
वृश्चिक: महत्त्वाच्या कामात अपेक्षित यश मिळेल. स्पष्टवक्तेपणामुळे हितशत्रुंकडून काही अडथळा निर्माण होऊ शकतो. बोलण्यात संयम ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु: मन प्रसन्न ठेवा. सकारात्मक विचाराने कामामध्ये प्रगती साधेल. भाग्याची साथ लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आध्यात्मिक धार्मिक कामात मन रमेल. नवीन संधी मिळतील.
मकर: तज्ञ व्यक्तींचा सल्ला लाभदायक होईल. कामातील अडचणी दूर होतील. हितसंबंध सुधारतील. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
कुंभ: भेटीगाठीतून नवीन संबंध प्रस्थापित होतील, नविन कल्पना सुचतील. कौशल्यपूर्ण संवादाने प्रतिष्ठा सन्मान मिळेल. उत्साह वाढेल. आर्थिक कामांना गती मिळेल.
मीन: चांगला दिवस आहे. नियोजित कार्यात प्रगती साधेल. कामातील यशामुळे समाधानकारक दिवस असेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल. जवळचे प्रवास संभवतात.





Leave a Reply