बीड – एकीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार मंत्री पंकजा मुंडे यांच्या सहित आमदार खासदार हे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडून त्यावर शिक्कामोर्तब करत असताना दुसरीकडे सामाजिक वनीकरण च्या एका अधिकाऱ्याने थोडेथोडके नवे तर 45 लाख रुपये लाच म्हणून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या लाचखोराला पकडले आहे. बीड ची तुलना बिहार शी करणारे अनेक अधिकारी हे बीडमध्ये आल्यानंतर मात्र लाखो करोडो कमवून जातात याचे हे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा आहे. बीडच्या प्रशासनात भ्रष्टाचार किती बोकाळला आहे आणि त्यावर कसे नियंत्रण आणता येईल याचे देखील नियोजन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी करावे अशी मागणी होत आहे.
श्रीनिवास लखमवाड असे सामाजिक वनीकरण विभागातील लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. लखमवाड याने सन 2025-26 मधील वृक्षलागवडीची बिले मंजूर करून देण्यासाठी, कर्मचार्यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी 45 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी सापळा रचला. यावेळी श्रीनिवास लखमवाड याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. यामध्ये पाच लाख रुपये खर्या नोटा व बाकी मनोरंजन(खोट्या नोटा) बँक मधील नोटा स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने केल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.





Leave a Reply